टाॅवर होणार कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:09+5:302021-04-08T04:31:09+5:30
राजापूर : तालुक्यातील चार ठिकाणी जिओ मोबाइल टाॅवरला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या परिसरातील ग्राहकांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर दूर ...
राजापूर : तालुक्यातील चार ठिकाणी जिओ मोबाइल टाॅवरला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या परिसरातील ग्राहकांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर दूर झाली आहे. सध्या सर्वच कामे तसेच शैक्षणिक कामकाजही ऑनलाइन सुरू आहे. मात्र, नेटवर्कमधील समस्येमुळे अडचण येत होती. मात्र, ती आता दूर होणार आहे.
सुरक्षा यंत्रणेची तपासणी
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांत आगीच्या दृर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अनुषंगाने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमधील अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे किंवा नाही, यासाठी तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
पोलीस पाटील यांना मार्गदर्शन
देवरूख : संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोलीस पाटील सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. वर्षभरात गावागावामध्ये होणारे कार्यक्रम याविषयीचे नियम तसेच कोरोना संक्रमणविषयक नियमावली याविषयी पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करण्यात आले.
रस्त्याची दुरवस्था
रत्नागिरी : शहरातील विमानतळापासून वेतोशीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना त्रासदायक होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गटारांची दुरुस्ती
देवरूख : आता पावसाळ्यापूर्वी गटारांच्या कामाला वेग आला आहे. शहरात सध्या चार ठिकाणी गटारांच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता रस्ते सुरक्षित होणार आहेत. या गटार कामांच्या दुरुस्तीमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.