गोवळकोट येथे तीन ठिकाणी बसवली खेळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:43+5:302021-06-09T04:39:43+5:30
चिपळूण : येथील नगर परिषदेकडून शहरातील प्रत्येक प्रभागात खेळणी बसविण्यात येत आहेत. त्यानुसार गोवळकोट येथे तीन ठिकाणी खेळणी बसविण्यात ...
चिपळूण : येथील नगर परिषदेकडून शहरातील प्रत्येक प्रभागात खेळणी बसविण्यात येत आहेत. त्यानुसार गोवळकोट येथे तीन ठिकाणी खेळणी बसविण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेने प्रत्येक प्रभागात खेळणी बसविण्याचा निर्णय घेतला होता.
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या नेतृत्त्वाखाली हा एकमताने निर्णय घेतला होता. प्रत्येक नगरसेवकासाठी एक संच देण्यात आला आहे. डबल घसरगुंडी व दोन झोपाळे असा हा संच आहे. नगरसेविका सुषमा कासेकर व कै. भगवान बुरटे यांच्याकरिता तीन संच उपलब्ध झाले होते. त्याप्रमाणे गोवळकोट जिल्हा परिषद मराठी शाळा, उर्दू शाळा व भोईवाडी मराठी शाळा या तीन ठिकाणी ही खेळणी बसविण्यात आली. या कामाचा शुभारंभ नगर परिषद कर्मचारी ह. भ. प. तुकाराम बेचावडे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका सुषमा कासेकर, जीवन बांद्रे, दत्ताराम हेलवंडे, मंगेश खापरे, किरण बांद्रे, सचिन आग्रे, संतोष शिंदे, संजय बुरटे, बाबू महाकाळ उपस्थित होते.
फोटो -
चिपळूण शहरातील गोवळकोट येथील जिल्हा परिषद मराठी शाळेनजीक नवीन खेळणी बसविण्याच्या कामाचा तुकाराम बेचावडे यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला़ यावेळी सुषमा कासेकर, जीवन बांद्रे, दत्ताराम हेलवंडे, मंगेश खापरे, किरण बांद्रे, सचिन आग्रे, मिलिंद आग्रे उपस्थित होते.