सागाच्या लाकडाने भरलेला ट्रॅक्टर वन खात्याने केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:35+5:302021-04-29T04:23:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी शिवाजी नगर परिसरात सोमवारी सायंकाळी विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी सागाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी शिवाजी नगर परिसरात सोमवारी सायंकाळी विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी सागाच्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. हा ट्रॅक्टर सागाच्या लाकडासह जप्त करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सायंकाळी विभागीय वनअधिकारी खाडे हे कोल्हापूरहून आपल्या कार्यालयाकडे चिपळूण येथे येत असताना त्यांना लाकूड वाहतूक करणारा ट्रॅक्टर दिसला. त्यांनी हा ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली असता ट्रॅक्टरमध्ये सागाची लाकडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वनरक्षक राजाराम शिंदे यांना बोलावून कारवाईबाबत आदेश दिले. हा ट्रॅक्टर चिपळूणच्या दिशेने चालला होता. रात्री वनपाल किशोर पत्की व वनरक्षक शिंदे यांनी ट्रॅक्टर जप्त केला. या ट्रॅक्टरमध्ये सागाचे १६ ओंडके होते.