पारंपारीक मच्छीमारांचे दापोलीत धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 12:53 PM2022-03-11T12:53:26+5:302022-03-11T12:54:03+5:30
सुधारीत मासेमारी अधिनियम १९८८ च्या कायद्याची अंमलबजावणी करणे, मासेमारी व्यवसायासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करणे, डिझेल परतावा लवकर मिळावा यासह आदी प्रमुख मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, गुहागर संघर्ष समिती व हर्णे बंदर कमिटी यांच्यावतीने मच्छीमारांच्या प्रमुख मागण्यासाठी आज पारंपारिक मच्छिमारांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. याआंदोलनात मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुधारीत मासेमारी अधिनियम १९८८ च्या कायद्याची अंमलबजावणी करणे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालय आयुक्त रत्नागिरी यांना पदावरून बडतर्फ करणे, मासेमारी व्यवसायासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करणे, डिझेल परतावा लवकर मिळावा यासह आदी प्रमुख मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
मागण्यासाठी, हर्णे बंदर जेटीचे लवकरात लवकर काम मंजूर करणे, १२० एचपी च्या वरच्या लोकांना डिझेल परताव्यात समाविष्ट करणे, शासनाने मच्छी दुष्काळ जाहीर करावे, समुद्रातील परप्रांतीय फास्टर लोकांना मत्स्यव्यवसाय खात्यामार्फत पकडण्यात यावे, मच्छीमारांचे कर्ज माफ करावे, या आदी. मागण्या देखील करण्यात आल्या.