रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा हंगामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 04:58 PM2017-09-03T16:58:47+5:302017-09-03T16:58:53+5:30
रत्नागिरी : गौरी - गणपतीच्या विसर्जनानंतर मुंबईकरांची परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी उसळत आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांवर गोवा व सावंतवाडीहून येणाºया गाड्या भरून येत आहेत. त्यामुळे बोगींचे दरवाजेच उघडले जात नाहीत. परिणामी रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर गाडीतील व प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांमध्ये तंटे सुरू आहेत. अधिकाºयांना धारेवर धरले जात आहे. या गाड्यांमध्ये प्रवेशच न मिळाल्याने गुरूवारी रात्री बहुसंख्य प्रवाशांना स्थानकांवरच रात्र जागत काढावी लागली.

गुरूवारी गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर मुंबईत परतण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी उसळली. मात्र, गुरूवारी सावंतवाडीहून सायंकाळी सुटलेली तुतारी एक्सप्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांवरच फुल्ल झाली. वैभववाडीतही अनेक प्रवाशांना गाडीत प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर गाडीतील प्रवाशांनी या गाडीच्या जनरल बोगींचे दरवाजेच बंद केले.
या गाडीत शिरायलाही वाव नव्हता. राजापूरपासून प्रवाशांना गाडीतील जनरल बोगींमध्ये जागाच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. रत्नागिरी स्थानकात रात्री ही गाडी दहा वाजण्याच्या सुमारास आली. तेव्हा हंगामा झाला. जागाच न मिळाल्याने प्रवाशांनी आदळआपट करून संताप व्यक्त केला. रत्नागिरीसह चिपळूण व खेड स्थानकांवर गाडीतील प्रवासी व प्लॅटफॉर्मवरील प्रवासी यांच्यात बाचाबाची झाली. रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करूनही हा हंगामा सुरूच होता.
तुतारी एक्सप्रेसनंतर मडगावहून सायंकाळी सुटलेली कोकणकन्या मुळातच मडगावहून भरून आली. उरलीसुरली जागा सिंधुदुर्गमधील गणेशभक्तांनी अडवली. रात्री ११.३० वाजण्याच्या सुुमारास रत्नागिरी स्थानकात आलेल्या या गाडीच्या जनरल बोगींचे दरवाजेही बंद होते. त्यामुळे पुन्हा दरवाजांवर धडक मारली गेली.