रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता बघावी लागणार नाही वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 12:05 PM2021-12-10T12:05:09+5:302021-12-10T12:06:29+5:30

गाड्यांमधील रिक्त जागेचा संदेश आपोआप मोबाईलवर येणार आहे.

Train passengers will no longer have to wait for ticket confirmation | रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता बघावी लागणार नाही वाट

रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता बघावी लागणार नाही वाट

Next

शोभना कांबळे

रत्नागिरी : रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता वाट बघण्याची गरज राहणार नाही. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी ‘पुशअप’ नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोणत्या गाडीत सीट उपलब्ध आहे, याची माहिती आता थेट प्रवाशांना संदेशाद्वारे मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे.

आतापर्यंत रेल्वेच्या तिकिटासासाठी प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, आता पुशअप या सुविधेमुळे ऑनलाईन शोध घेण्याची गरज लागणार नाही. त्या मार्गावरील गाड्यांमधील रिक्त जागेचा संदेश आपोआप मोबाईलवर येणार आहे.

पुशअपच्या पर्यायावर क्लिक करा

- प्रवाशांना उपलब्ध सीटसाठी ऑनलाईन शोध घ्यावा लागणार आहे.

- ऑनलाईन तिकिटाचे बुकिंग करत असताना पुशअपचा पर्याय निवडावा लागणार आहे.

- प्रवाशांनी ऑनलाईन पुशअप सुविधेचा पर्याय निवडल्यानंतर त्या मार्गावरून धावणाऱ्या कोणत्याही गाडीत जागा उपलबध होताच त्या प्रवाशाला मोबाईलवरून संदेश तातडीने पाठविला जाईल.

- प्रवाशांना मोबाईलवरूनच उपलब्ध सीटची माहिती मिळणार आहे.

- प्रवाशांना उपलब्ध सीटसाठी ऑनलाईन शोध घ्यावा लागणार आहे.

नाेंदणीकृत माेबाईलवर माेफत मेसेज

- रेल्वेच्या प्रवाशांना ऑनलाईन अधिक शोधाशेाध करायला लागू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

- नोंदणीकृत मोबाईलवरून पुशअपचा पर्याय निवडल्यानंतर प्रवाशांनी ऑनलाईन नोंदविलेल्या मोबाईलवर सीट उपलब्ध होताच मोफत संदेश पाठविला जातो.

टेन्शन नको.....

 

 

रेल्वेतून प्रवास करण्याआधी आपल्याला गाडीत जागा मिळेल ना, ही धाकधूक असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशाने पुशअप हा पर्याय ऑनलाईन तिकीट आरक्षित करताना निवडला तर त्याला त्या मार्गावरून जाणाऱ्या कुठल्या गाडीमध्ये जागा आहे, याचा संदेश थेट त्याच्या मोबाईलवर जाणार असल्याने सीटची चिंता करण्याची गरज नाही.

सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस

- जनशताब्दी एक्स्प्रेस

- मंगला एक्स्प्रेस

- नेत्रावती एक्स्प्रेस

- मांडवी एक्स्प्रेस

- तुतारी एक्स्प्रेस

- काेकणकन्या एक्स्प्रेस

- मत्स्यगंधा एक्स्प्रेस

- मुंबई एक्स्प्रेस

Web Title: Train passengers will no longer have to wait for ticket confirmation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.