गाड्या सुरु कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:43+5:302021-09-21T04:34:43+5:30
दापोली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून अनेक गावांमधील एस. टी. गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ...
दापोली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून अनेक गावांमधील एस. टी. गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बंद असलेल्या या गाड्या सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत करण्यात आली आहे. या गाड्या सुरु झाल्यास ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.
भात खरेदीसाठी नोंदणी
रत्नागिरी : मार्केटिंग फेडरेशन आणि जिल्हा पणन कार्यालय यांच्यातर्फे जिल्ह्यात नवीन हंगामातील भातखरेदी करण्यात येणार आहे. धान्य खरेदीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत ठेवण्यात आली आहे. सध्या शेतकऱ्यांकडून भात खरेदीसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
ऑनलाईन संवाद
सावर्डे : गणेशोत्सवानंतर पितृपक्षाला प्रारंभ होतो. हिंदू धर्मात श्राद्धविधीला विशेष महत्व आहे. मात्र, श्राद्ध करण्याचे महत्व आणि त्याविषयीचे धर्मशास्त्र याबाबतची माहिती शास्त्रशुद्ध नसल्याने अनेक अपसमज पसरतात. हे दूर करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ऑनलाईन विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता.
पुणे सुपरफास्ट स्पेशल
रत्नागिरी : कोकण मार्गावर पुणे - एर्नाकुलम साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल २९ सप्टेंबरपासून आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून, दर रविवारी आणि बुधवारी कोकण मार्गावर धावणार आहे.
सीए फाऊंडेशनमध्ये यश
खेड : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सी. ए. फाऊंडेशन परीक्षेत भरणे बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील शुभम भोसले आणि आदित्य गाडगीळ यांनी उत्तम यश मिळविले. या विद्यार्थ्यांना प्रा. रुपाली बोडस, प्रा. फरहीन काझी, प्रा. पारस नलावडे, बाळासाहेब राऊत, आशुतोष वाजपेयी यांचे मार्गदर्शन लाभले.