रत्नागिरी, चिपळूण, दापाेलीतील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

By शोभना कांबळे | Published: May 9, 2023 12:44 PM2023-05-09T12:44:41+5:302023-05-09T12:45:10+5:30

राज्य शासनाने बदल्यांचे आदेश काढले

Transfers of Sub District Officers in Ratnagiri, Chiplun, Dapoli | रत्नागिरी, चिपळूण, दापाेलीतील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी, चिपळूण, दापाेलीतील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्ह्यात प्रशासकीय बदल्यांचे वारे वाहत असून, राज्य शासनाने बदल्यांचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील चार उपविभागीय दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी व चिपळूणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांची रायगड येथे बदली झाली आहे. तर कोकण भवन येथून निशा कांबळे यांची रत्नागिरी भूसंपादन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रत्नागिरीचे प्रांताधिकारी म्हणून विकास सूर्यवंशी यांनी चार वर्ष उत्कृष्ट कामगिरी बजावली. रत्नागिरी विमानतळाच्या वाढीव कामासाठी जागा ताब्यात घेण्यापासून जागा मालकांना अधिकचा दर मिळावा यासाठी त्यांनी जलदगतीने कामे केली. रायगड जिल्ह्याच्या रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारीपदी त्यांची बदली झाली आहे.

चिपळूण येथे महापुरासह कोरोना काळात चांगली कामगिरी बजावणारे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांचीही रायगड भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दापोलीचे उपजिल्हाधिकारी शरद पवार यांची निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

रत्नागिरीच्या उपजिल्हाधिकारी भूसंपादन म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या सविता लष्करे यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोकण भवन येथून निशा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. रत्नागिरी, चिपळूण व दापोली ही तीनही पदे रिक्त ठेवण्यात आली असून, लवकरच या जागांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

Web Title: Transfers of Sub District Officers in Ratnagiri, Chiplun, Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.