धनगरवाडीला दिशांतरचा सहकार्याचा हात

By admin | Published: March 22, 2015 11:11 PM2015-03-22T23:11:47+5:302015-03-23T00:34:35+5:30

आगळा उपक्रम : गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Transit handover of Dhangarwadi | धनगरवाडीला दिशांतरचा सहकार्याचा हात

धनगरवाडीला दिशांतरचा सहकार्याचा हात

Next

चिपळूण : लोकवस्तीपासून आणि एकूणच सामाजिक विकासाच्या प्रवाहापासून खूप दूर असणाऱ्या धनगर समाजाच्या वाड्यावस्त्या. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सेवासुविधांपासून दूर असणाऱ्या या वाड्यावस्त्यांना सहकार्याचा स्नेहार्द हात उपक्रमांतर्गत १२ कुटुंबांसाठी साहित्य व ३२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ‘दिशांतर’ संस्थेतर्फे करण्यात आले. गावातील लोकवस्तीपासून अक्षरश: कोसो दूर असणाऱ्या वाड्यावस्त्या धनगर समाजाच्या निमित्ताने पाहता येतात. सह्याद्रीच्या खोऱ्यातील डोंगरावर पूर्वापार वस्ती करणाऱ्या या समाजाला स्वातंत्र्यानंतरही सेवासुविधांपासून वंचितच राहवे लागले आहे. वस्तीवर कुणी आजारी पडले, स्त्री गरोदर असेल, कुणी झाडावरून पडले वा कुणाला साप अथवा विंचूदंश झाला, तर अशा अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णाला डोलीतून न्यायचे असेल तर अडीच ते तीन तासाचे अंतर पार करावे लागत. जिथल्या दऱ्याखोऱ्यातून एकट्या माणसाला चालायलादेखील काही ठिकाणी कठीण जाते, तिथे डोलीतून कुणाला नेणे किती जिकरीचे असेल याची कल्पनाही न केलेली बरी. अनेकदा व्यवस्थेच्या या शोधाशोधीतच अनेकांचे प्राण गेलेले असतात. ओवळी गावातील राजवाड्याच्या मागील भागातून साधारणत: अर्धा तास चालल्यानंतर डोंगररांगा सुरु होतात. येथील उभ्या वाटांची बिकट वहिवाट न थकता चालत राहिलं तर पावणे दोन तासात पाच डोंगर ओलांडले की सहाव्या डोंगराचा कळसभाग दिसू लागतो. आधीच श्वास कोंडत आलेला नि पायात गोळे आलेले अशा स्थितीत आणखीन एक डोंगर खुणावताना दिसतो नि शरीरातील उरले सुरले त्राण निघून जातात. पण, पायाखालचा डोंगर संपत असतानाच भाताच्या उडव्या दिसू लागतात. आपण कळकवणे खलिपावाडीत अर्थात धनगरवाडीत पोहोचलेलो असतो. पहिली ते दहावी या इयत्तांमधील ३२ विद्यार्थी येथे आहेत. ‘दिशांतर’ टीमने सहकार्याचा हात उपक्रमाअंतर्गत इथल्या प्रत्येक कुटुंबाला कपड्यांच्या पॅकेटस्चे वितरण केले. (प्रतिनिधी)

Web Title: Transit handover of Dhangarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.