विद्युतीकरण मशीन रुळांवरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:58 PM2019-05-14T12:58:16+5:302019-05-14T13:02:09+5:30
विद्युतीकरण मशीन रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
रत्नागिरी - विद्युतीकरण मशीन रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भोके गावाजवळ रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाच्या कामासाठी आणलेले मशीन रुळावरून घसल्याने कोकण रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून, त्यासाठी हे मशीन आणण्यात आणले आहे. दरम्यान, काम सुरू असताना ही मशीन रुळावरून घसरल्याने मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे एक मार्गी असलेल्या कोकण रेल्वेची मुंबईकडे येणारी आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सुमारे तासाभरापासून वाहतून बंद असून वाहतून पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने ऐन हंगामात प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.