ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:30+5:302021-07-08T04:21:30+5:30
चिपळूण : तालुक्यातील धामणवणे ग्रामपंचायतीच्या आवारात जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी सरपंच सुनील ...
चिपळूण : तालुक्यातील धामणवणे ग्रामपंचायतीच्या आवारात जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी सरपंच सुनील सावंत, नीलेश शेंबेकर, शिरीष चौधरी, शिवाजी शिंदे, दर्शन देशपांडे, सुभाष जाधव, रिया सावंत, अंजू उंडरे आदी उपस्थित होते.
रेल्वेला थांबा देण्याची मागणी
देवरूख : मुंबई व ठाणे शहरात राहणाऱ्या तसेच कामानिमित्त संगमेश्वरहून मुंबई, ठाण्यात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसला थांबा मिळावा, अशी मागणी १९६ गावांमधील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरातील भागांमध्ये भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रस्त्यावर झुडींच्या झुंडीने फिरणाऱ्या या श्वानांचा त्रास अनेक वाहनचालक विशेषत: दुचाकीस्वारांना अधिक होत आहे. त्यामुळे या श्वानांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज करताना अडचणी
रत्नागिरी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची साईट बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर या योजनेचा हप्ता जमा झाला आहे किंवा नाही, हे समजत नाही. काही शेतकऱ्यांच्या कागदपत्रांत त्रुटी आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. पेन्शनपासून शेतकरी वंचित राहिल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मार्ग निवाऱ्याची दुरवस्था
देवरूख : शहरातील पंचायत समितीजवळ उभारण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेडची दुरवस्था झाली आहे. ही निवारा शेड दोनच वर्षांपूर्वी उभारण्यात आली आहे. मात्र, ती आता नादुरूस्त झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही शेड दुरूस्त करण्याची मागणी समविचारी संघातर्फे करण्यात आली आहे.