चिपळुणातील प्रकल्प अडचणीत

By admin | Published: February 9, 2015 09:53 PM2015-02-09T21:53:47+5:302015-02-10T00:25:04+5:30

विकास योजनाच बंद : शहरवासीयांना प्रतीक्षा आता पुढील कार्यवाहीची

Trouble in Chiplun Project | चिपळुणातील प्रकल्प अडचणीत

चिपळुणातील प्रकल्प अडचणीत

Next

चिपळूण : केंद्र व राज्य शासनातर्फे राबवण्यात येणारी एकात्मिक शहर विकास योजना बंद झाल्याने चिपळूण शहरात सुरु असणाऱ्या अंदाजे साडेतीन कोटींच्या प्रकल्पांची कामे रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या काही वर्षात या योजनेसाठी नगर परिषद प्रशासनाला केवळ ६५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.शहराच्या वैभवात भर पडावी, यासाठी एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत मटण - मच्छी मार्के ट, महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई व महिला क्रीडा संकुल या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली. तत्कालीन नगराध्यक्षा उषाताई लवेकर यांच्या कारकिर्दीत ही कामे सुरु झाली. यापैकी महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईचे काम अंतिम टप्प्यात असून, गेल्या काही महिन्यांपूर्वी या मंडईचे उद्घाटन नगराध्यक्षा सावित्री होमकळस, माजी आमदार रमेश कदम व नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र, या मंडईचे मूल्यांकनाचे काम रखडल्याने उद्घाटन होऊनही मंडई बंद आहे. मंडईचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिलही अद्याप प्रलंबित आहे.
शहरातील बाजारपेठेत मटण व मच्छी विक्रेत्यांना एका छताखाली बसता यावे, यासाठी मटण - मच्छी मार्केट इमारतीचे काम घेण्यात आले. हे कामही गेली ७ ते ८ वर्षे कासव गतीने सुरु आहे. रावतळे (विंध्यवासिनी) या भागात महिला क्रीडा संकुलाचे काम नगर परिषद प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले असून, हे कामही रखडले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत ही कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, ही योजनाच बंद झाल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
अंदाजे साडेतीन कोटींचे हे प्रकल्प असून, एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत केवळ ६५ लाखांचा निधी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. याबाबत सत्ताधारी व विरोधक ठप्प झालेले प्रकल्प कोणत्या योजनेतून मार्गी लावतात, चिपळूण शहरात पालिकेत विकासकामांवर नेहमी धमासान सुरू असते आता काय होणार याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Trouble in Chiplun Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.