खड्ड्यांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:34 AM2021-08-27T04:34:12+5:302021-08-27T04:34:12+5:30
हातखंबा : मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रवशांना या खड्ड्यांचा अतोनात त्रास होत आहे. या महामार्गावरील ...
हातखंबा : मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रवशांना या खड्ड्यांचा अतोनात त्रास होत आहे. या महामार्गावरील निवळी ते हातखंबादरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने वाहनचालकांना त्रासदायक होत आहे. गेल्या हंगामात रस्त्याचे काम सुरू होते. यंदाच्या पावसाळ्यात ही माती रस्त्यावर आली आहे.
विद्यार्थी संख्या रोडावली
रत्नागिरी : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल आदीकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे. तंत्रशिक्षण तसेच विविध शासकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून आयटीआयच्या अभ्यासक्रमांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.
दरडीचा धोका कायम
गुहागर : मोडका आगर ते शृंगारतळी या भागात काम करताना पाटपन्हाळे कॉलेज परिसरातील डोंगर पोखरण्याचे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. त्यामुळे या भागातील माती कोसळू लागली आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी मे महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. दरडीचा धोका कायम असूनही या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
खड्डे भरण्यास प्रारंभ
रत्नागिरी : अखेर कित्येक महिन्यांचा त्रास सहन केलेल्या नागरिकांना शहरातील खड्डे भरण्यास प्रारंभ केल्याने दिलासा मिळू लागला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे अनेक भागात दुचाकी वाहनांचे अपघात होत होते. त्याचप्रमाणे दर दिवशीच या खड्ड्यातून प्रवास करताना वाहनचालकांचे हाल होत होते.
मदतकर्त्यांचा सत्कार
खेड : काही दिवसांपूर्वी झालेल्या महापुरात कासारआळी येथील तरुणांनी जिवाची पर्वा न करता महापुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी आणले. या तरुणांचा सत्कार श्री महाकाली महिला मंडळातर्फे करण्यात आला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा वैशाली कवळे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.