ट्रक दरीत कोसळला, चालक सुदैवाने बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 16:00 IST2021-01-02T15:58:46+5:302021-01-02T16:00:45+5:30
Accident Hospital Ratnagiri- मुंबई - गोवा महामार्गावर वरची पेठेतील मोठ्या पुलाजवळ एक ट्र्क सुमारे १०० ते १५० फुट दरीत कोसळून झालेल्या अपघातात वाहन चालक सुदैवाने बचावला. रामप्रसाद मिना (३५, रा. राजस्थान) असे चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्याने घडली.

ट्रक दरीत कोसळला, चालक सुदैवाने बचावला
राजापूर : मुंबई - गोवा महामार्गावर वरची पेठेतील मोठ्या पुलाजवळ एक ट्र्क सुमारे १०० ते १५० फुट दरीत कोसळून झालेल्या अपघातात वाहन चालक सुदैवाने बचावला. रामप्रसाद मिना (३५, रा. राजस्थान) असे चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्याने घडली.
गोव्याकडून मुंबईकडे टायर भरुन चाललेला ट्रक (आरजे २३, जीबी ३४७१) कोंढेतड येथील अवघड वळणावर आला असता ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्र्क रस्त्यापासून सुमारे शंभर ते दीडशे फुट खोल दरीत जाऊन कोसळला. तत्पूर्वी वाहन चालक रामप्रसाद मिना याने ट्रकबाहेर उडी मारल्याने तो बचावला.
अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थ जितेंद्र तुळसवडेकर, भास्कर कुवळेकर, सुनील पटेल आदींसह अनेकांनी अपघातस्थळी भेट दिली. या अपघाताची माहिती मिळताच राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, उपनिरीक्षक संतोष वालावलकर, पोलीस कर्मचारी सागर कोरे, वाहतूक पोलीस सचिन बळीप अपघातस्थळी दाखल झाले.
जखमी वाहन चालकाला तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री व डॉ. गिरीष मोहकर यांनी जखमी चालकावर उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.