Accident: भाट्ये येथे टेम्पाेवर ट्रक पलटला, टेम्पाेचालकाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 07:01 PM2022-08-23T19:01:07+5:302022-08-23T19:02:08+5:30

तन्मय दाते रत्नागिरी : रत्नागिरी - पावस मार्गावरील भाट्ये येथील अवघड वळणावर पावडरची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक छाेटा हत्ती ...

Truck overturns on Tempe at Bhatye, Tempe driver dies | Accident: भाट्ये येथे टेम्पाेवर ट्रक पलटला, टेम्पाेचालकाचा दुर्दैवी मृत्यू

Accident: भाट्ये येथे टेम्पाेवर ट्रक पलटला, टेम्पाेचालकाचा दुर्दैवी मृत्यू

Next

तन्मय दाते

रत्नागिरी : रत्नागिरी - पावस मार्गावरील भाट्ये येथील अवघड वळणावर पावडरची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक छाेटा हत्ती टेम्पाेवर पलटी झाल्याची घटना आज, मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. ट्रकखाली अडकलेल्या टेम्पाेतील चालकाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु हाेते. मात्र, टेम्पाेत अडकून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

फिनाेलक्स कंपनीतून मालवाहतूक ट्रक (जीजे १६, एयु ५४१५) चालक सुनील कुमार तरसिमलाल ललहाेत्रा (रा. पंजाब) रत्नागिरीच्या दिशेने येत हाेता. हा ट्रक पंजाबच्या दिशेने जात हाेता. तर रत्नागिरीतून पूर्णगडच्या दिशेने सिकंदर गावखडकर छाेटा हत्ती टेम्पाे (एमएच ०८, एपी १३५७) घेऊन जात हाेता. त्यांच्यासाेबत गालिफ पांढरे आणि प्रजाली प्रताप पेटकर (सर्व रा. पूर्णगड) हे प्रवास करत हाेते.

भाट्ये येथील अवघड वळणावर मालवाहू ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला. हा ट्रक समाेरुन येणाऱ्या टेम्पाेवर पडल्याने टेम्पाे ट्रकखाली अडकून पडला हाेता. टेम्पाेचालकासह प्रवासी अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु हाेते. त्यातील तिघांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, टेम्पाे चालकाचा टेम्पाेत अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.

Web Title: Truck overturns on Tempe at Bhatye, Tempe driver dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.