हापूसच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करणार : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:29 PM2018-10-28T22:29:24+5:302018-10-28T22:30:01+5:30

रत्नागिरी : कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे महाराष्ट्रभर मार्केटिंग व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करणार असून, राज्यातील अन्य पिकांचे विविध जिल्ह्यांत ...

Trying to market Hapus: Subhash Deshmukh | हापूसच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करणार : सुभाष देशमुख

हापूसच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करणार : सुभाष देशमुख

googlenewsNext

रत्नागिरी : कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे महाराष्ट्रभर मार्केटिंग व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करणार असून, राज्यातील अन्य पिकांचे विविध जिल्ह्यांत प्रदर्शन भरविण्याचाही शासनाचा मानस आहे. त्याची जबाबदारी पणन विभागाने घ्यावी. त्यासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबरोबर शेतकºयांना विक्री कौशल्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आंबा व काजू उत्पादक शेतकरी यांच्या सोयीसाठी महाराष्टÑ स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत उभारलेल्या अद्ययावत लिलावगृहाचे उद्घाटन सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे उपस्थित होते.
सेस हा बाजार समितीचा एकमेव उत्पन्नाचा मार्ग आहे, त्यामुळे तो बंद करता येणार नाही. मात्र मच्छिमारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना बाजार समिती संचालक मंडळाची एकत्रित असणारी वाटचाल सकारात्मक आहे. आंबा, काजू उत्पादक शेतकरी यांचे पुनर्गठित कर्ज, व्याजमाफीची रक्कम अद्याप मिळालेली नाही. मच्छिमारांचा डिझेल परतावा व अन्य समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावून मार्ग काढावा, अशी सूचना सामंत यांनी केली.

Web Title: Trying to market Hapus: Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.