Accident: परशुराम घाटात एसटी बसला पाठिमागून टँकरची धडक; वेळ चांगली, अन्यथा..

By संदीप बांद्रे | Published: August 26, 2022 04:41 PM2022-08-26T16:41:30+5:302022-08-26T17:03:59+5:30

चौपदरीकरणा अंतर्गत या वळणाच्या ठिकाणी अंडरपास मार्ग उभारला जात आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली आहे. परंतू हा रस्ता अतिशय तीव्र उताराचा असल्याने येथे नियमीत अपघात घडत आहेत.

Tucker hit from behind ST bus in Parashuram Ghat, Two passengers injured | Accident: परशुराम घाटात एसटी बसला पाठिमागून टँकरची धडक; वेळ चांगली, अन्यथा..

Accident: परशुराम घाटात एसटी बसला पाठिमागून टँकरची धडक; वेळ चांगली, अन्यथा..

googlenewsNext

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एसटी बसला पाठिमागून टँकरने धडक दिली. यात एसटी बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली. यात दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये तब्बल ६४ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने एसटी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडल्याने अनर्थ टळला. अन्यथा उजव्या बाजूला दरीचा मोठा धोका होता. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी प्रवाशांना कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

चिपळूण आगारातील एसटी बस खेडहून चिपळूणला येत असताना परशुराम घाट माथ्यावरील अवघड वळणावर आली आली असता हा अपघात घडला. चौपदरीकरणा अंतर्गत या वळणाच्या ठिकाणी अंडरपास मार्ग उभारला जात आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली आहे. परंतू हा रस्ता अतिशय तीव्र उताराचा असल्याने येथे नियमीत अपघात घडत आहेत.

याआधी या वळणावरच दोन मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर किरकोळ अपघाताच्या घटनाही येथे घडत आहेत. त्यातच चिपळूण आगाराच्या एसटी बसला मागून टँकरची मागून धडक बसून अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच आगारप्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुपारच्या वेळेत खेड मार्गावर बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची नेहमी गर्दी असते. बसमध्ये ६४ प्रवासी प्रवास करीत होते. या सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढून अन्य बसच्या साह्याने चिपळूण आगारात आणण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देऊन क्रेनच्या साह्याने एसटी बस बाहेर काढण्यात आली.

Web Title: Tucker hit from behind ST bus in Parashuram Ghat, Two passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.