सेस वसूल करणे हा तुघलकी निर्णय : सतीश नारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:05+5:302021-05-09T04:33:05+5:30

राजापूर : बाजार समितीने परवाने बंद करून सेस वसूल करणे हा तुघलकी निर्णय असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष ...

Tughlaq decision to recover cess: Satish Narkar | सेस वसूल करणे हा तुघलकी निर्णय : सतीश नारकर

सेस वसूल करणे हा तुघलकी निर्णय : सतीश नारकर

Next

राजापूर : बाजार समितीने परवाने बंद करून सेस वसूल करणे हा तुघलकी निर्णय असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी केली आहे.

आता काही वर्षांत जीआय ‘क’ नामांकने, तसेच मोठ्या प्रमाणावर आंबा निर्यात अशा चांगल्या गोष्टी आंबा बागायतदारांसाठी होत होत्या, त्यात गेले दोन हंगाम कोविड-१९ मुळे बाधित झाले व त्यातच राज्य सरकारने आंब्याच्या व्यवसायाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष केले.

आंबा बागायतदार शेतकरी यांना या वर्षात एकदाही विमा संरक्षण किंवा सबसिडी मिळाल्या नाहीत. आंबा बागायतदार आणि व्यावसायिकांना आंबा महोत्सव नाही. आंबा वाहतूक जीवनावश्यक सेवामध्ये येत असून, सतत वाहतुकीसाठी अडथळा व कोणताही खास उपाय योजना नाही. अशा मनमानी कारभाराचा आपण निषेध करीत असल्याचे नारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Tughlaq decision to recover cess: Satish Narkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.