बाराव्या दिवशी राजापुरात पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:36+5:302021-07-22T04:20:36+5:30

राजापूर : तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असून, सलग बाराव्या दिवशीही शहरात पूरसदृश स्थिती आहे. मंगळवारी सायंकाळनंतर जवाहर चौकापर्यंत आलेले ...

On the twelfth day, the situation in Rajapur remained the same | बाराव्या दिवशी राजापुरात पूरस्थिती कायम

बाराव्या दिवशी राजापुरात पूरस्थिती कायम

googlenewsNext

राजापूर : तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असून, सलग बाराव्या दिवशीही शहरात पूरसदृश स्थिती आहे. मंगळवारी सायंकाळनंतर जवाहर चौकापर्यंत आलेले पुराचे पाणी बुधवारी सकाळपर्यंत ओसरले असताना सायंकाळी पुन्हा पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले होते.

राजापूर तालुक्यात गेले दोन आठवडे सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहराला पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या दोन आठवड्यांत जवळपास चार वेळा पुराचे पाणी जवाहर चौकाच्या वरपर्यंत आले आहे. जवळपास बारा दिवस चिंचबांध वरचीपेठ रस्ता तसेच जवाहर चौकातील नदीकिनाऱ्यालगतच्या टपऱ्या पुराच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मंगळवार सकाळपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यामुळे सायंकाळी कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकाच्या पुढेपर्यंत आले होते. त्यानंतर रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने बुधवारी सकाळपर्यंत पुराचे पाणी कमी झाले. मात्र, सकाळी पुन्हा पावसाने जोर धरल्याने सायंकाळी पुराच्या पाण्याने पुन्हा जवाहर चौकापर्यंत धडक दिली. त्यामुळे शिवाजीपथ, बंदरधक्का, वरचीपेठ, गुजराळी रस्ता पाण्याखाली गेला असून, वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान, या मुसळधार पावसामुळे डोंगर-विखारे-गोठणे रस्ता पुन्हा खचला आहे. कोंड्ये तर्फ सौंदळ येथील मनेश कोंडकर यांच्या घराच्या पडवीवरील छप्पर कोसळल्याने नुकसान झाले आहे.

Web Title: On the twelfth day, the situation in Rajapur remained the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.