जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे राम मंदिरासाठी अडीच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 03:29 PM2021-02-19T15:29:52+5:302021-02-19T15:33:28+5:30

ratnagiri Ram Mandir fund- रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी २.५३ कोटींवर रुपयांचा निधी दिला. हा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष पू. गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे देण्यात आला.

Two and a half crore for Ram Mandir by Jagadguru Narendracharyaji Maharaj Sansthan | जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे राम मंदिरासाठी अडीच कोटी

जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे राम मंदिरासाठी अडीच कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देजगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे राम मंदिरासाठी अडीच कोटीसुरुवातीपासूनच मंदिर उभारणीबाबत भूमिका

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीज धाम येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी २.५३ कोटींवर रुपयांचा निधी दिला. हा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष पू. गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे देण्यात आला.

यावेळी देवगिरी महाराज म्हणाले की, मी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे सामाजिक कार्य पाहून तृप्त झालो आहे. ते खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीचे काम करीत आहेत. संस्थानने दिलेला हा निधीरूपी प्रसाद सत्कारणी लागेल. जगदगुरू महाराजांचे हिंदूधर्म पुनर्प्रवेशाचे कार्य मोठे आहे, असे दूर दृष्टीचे महाराज या भूमीला लाभले आहेत, त्यांचे काम दिव्य आहे, असे सांगितले.

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यावेळी म्हणाले की, श्रीराम मंदिर उभारणीच्या निमित्ताने जातीपाती बाजूला ठेवून सर्व हिंदूंनी एकत्र येऊन राष्ट्र उभारणीचे काम करूया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद साधूसंतांना सतत प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत. यातून हिंदू धर्म विश्वधर्म होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सुरुवातीला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोविंद देवगिरी महाराजांचा जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विश्‍व हिंदू परिषदेचे गोवा - महाराष्ट्रचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, श्रीपाद जोशी, ज्येष्ठ पत्रकार उल्हास घोसाळकर यांनी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज व संस्थानच्या सेवाकार्याचा गौरव केला. विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री विनायक देशपांडे यांच्या हस्ते प्रवीण सावंत (पाली), प्रमोद खटखूळ (नाणीज), मनोज सुर्वे (पाली) या स्थानिक कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीपाद जोशी, अनिरूद्ध पंडित, मोहन भावे, विवस्वान हेबाळकर, जयंत देसाई, मुन्ना उर्फ रवींद्र सुर्वे, आनंद मराठे, उमा देवळे, उदय चितळे, सतीश घोटगे उपस्थित होते. प. पू. कानिफनाथ महाराज यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद भागवत यांनी केले.

सुरुवातीपासूनच मंदिर उभारणीबाबत भूमिका

अयोध्येत श्रीराम मंदिर झालेच पाहिजे, अशी भूमिका जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी सुरुवातीपासून घेतली होती. गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, उतराखंड आदी राज्यात होणाऱ्या दौऱ्यांमध्ये हिंदुत्व जागरण व श्री राम मंदिराची उभारणी याबाबत त्यांची जनजागृती सुरू होती.

 

Web Title: Two and a half crore for Ram Mandir by Jagadguru Narendracharyaji Maharaj Sansthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.