Ratnagiri: डेरवणात सापडले दोन बांगलादेशी तरूण, सावर्डे पोलिसांची कारवाई

By संदीप बांद्रे | Published: November 8, 2023 06:38 PM2023-11-08T18:38:16+5:302023-11-08T18:38:52+5:30

चिपळूण : काही दिवसांपूर्वी तीन बांगलादेशीना रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने खेर्डी येथून अटक केली होती. त्यापाठोपाठ डेरवण येथे आणखी ...

Two Bangladeshi youth found in Derwan, Sawarde police action | Ratnagiri: डेरवणात सापडले दोन बांगलादेशी तरूण, सावर्डे पोलिसांची कारवाई

Ratnagiri: डेरवणात सापडले दोन बांगलादेशी तरूण, सावर्डे पोलिसांची कारवाई

चिपळूण : काही दिवसांपूर्वी तीन बांगलादेशीना रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने खेर्डी येथून अटक केली होती. त्यापाठोपाठ डेरवण येथे आणखी दोन बांगलादेशी तरूण सापडले असून बुधवारी सकाळी सावर्डे पोलिसांनी त्यांना अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्यांची तत्काळ चौकशी सुरू केली आहे.

मुश्ताक महमंद शेख (३९,) शाहिन वहिब गाझी (२६, दोघेही बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही दोन महिन्यांपासून डेरवण येथे वास्तव्याला होते. बिगारी कामगार म्हणून ते सावर्डे परिसरात काम करत आहेत. जिथे ते कामाला होते, तिथेच ते राहत होते. या दोघांविषयी सावर्डे पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड व अन्य सहकाऱ्यांनी तत्काळ डेरवण येथे जाऊन या दोघांना ताब्यात घेत अटक केली. या दोघांकडून काही कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. 

आज, बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे दोघेजण भारतात कधी व कोणत्या मार्गाने आले, ते किती वर्षे येथे वास्तव्य करित आहेत, त्यांच्या येण्याचा हेतू काय, आदी बाबींची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.      

काही दिवसांपूर्वीच खेर्डी मोहल्ला येथून तिघा बांगलादेशींना रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. बुल्लू हुसेन मुल्ला, जलानी बुल्लू मुल्ला, जॉनी बुल्लू मुल्ला अशी त्यांची नावे होती. भारतात घुसखोरी  केल्यानंतर हे तिघेही सुरवातीला नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दोन-अडीच वर्षे वास्तव्याला होते. त्यानंतर ते खेर्डी येथे राहण्यास आले होते. त्याठिकाणी देखील ते 7-8 वर्षे वास्तव्यास होते. या तिघांविषयी न्यायालयीन प्रक्रीया सुरू असताना आणखी दोघे बांगलादेशी तरूण सापडल्याने चिपळुणात खळबळ उडाली आहे.

Web Title: Two Bangladeshi youth found in Derwan, Sawarde police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.