वादळ सदृश्य परिस्थितीमुळे हर्णै बंदरात दोन नौकांना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:57 PM2020-09-07T12:57:19+5:302020-09-07T13:01:20+5:30
दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात रविवारी रात्री अचानक आलेल्या वादळ सदृश्य परिस्थितीने अनेक नौकांची धुळधान उडाली. यामध्ये दोन नौकांना जलसमाधी मिळाली आहे. जलसमाधी मिळालेल्या नौकांवरील खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
दापोली : तालुक्यातील हर्णै बंदरात रविवारी रात्री अचानक आलेल्या वादळ सदृश्य परिस्थितीने अनेक नौकांची धुळधान उडाली. यामध्ये दोन नौकांना जलसमाधी मिळाली आहे. जलसमाधी मिळालेल्या नौकांवरील खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
रात्री मासेमारी करून परतणाऱ्या नौकांना वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका बसला. अचानक आलेल्या वादळामुळे नौका समुद्रामध्ये भरकटल्या. त्यामुळे मच्छिमारांमध्ये एकच हाहाकार उडाला. जो तो जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला.
नौका हर्णै बंदर परिसराच्या आजूबाजूला व सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला आल्यामुळे मोठी हानी टळली आहे. परंतु, याठिकाणी मच्छिमारांना वादळ सदृश्य परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागत आहे.