बसस्थानकातील ६० दुचाकींची सोडली हवा, चिपळूण एस्. टी. प्रशासनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:46 AM2020-01-10T10:46:10+5:302020-01-10T10:47:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात चुकीच्या ठिकाणी दुचाकी व अन्य वाहने उभी केली जात असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात चुकीच्या ठिकाणी दुचाकी व अन्य वाहने उभी केली जात असल्याने एस. टी.च्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एस. टी. प्रशासनाने गुरूवारी बसस्थानकाच्या आवारातील ६० हून अधिक दुचाकींची हवा सोडून कारवाई केली.
गेल्या काही वर्षांपासून येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम रखडले आहे. परिणामी बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहने पार्क करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकामाभोवती असलेल्या पत्र्याच्या कुंपनालगत वाहने उभी करून ठेवली जातात. मात्र, आधीच बांधकामामुळे एस. टी. वाहनांसाठी अपुरी जागा असल्याने त्यात खासगी वाहने उभी केली जात असल्याने मोठा अडथळा होत आहे. एस. टी. बस सहजासहजी वळविता येत नाही किंवा उभी करता येत नाही. सूचना देऊनही गाड्या उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे एस. टी. प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
याबाबत आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी सांगितले की, एस. टी. वळवताना एक - दोन दुचाकींना धक्का बसला. यावरून काही जण ओरड करतात. त्यासाठी दत्त मंदिर व वर्कशॉपच्या बाजूने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, तेथे भरावही केला आहे. मात्र, अनेक जण त्याठिकाणी वाहने पार्क न करता चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करत असल्यानेच ही कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात यापेक्षा अधिक कडक धोरण स्वीकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अ३३ंूँेील्ल३२