'कोमसाप'चे येत्या शनिवारपासून मालगुंड येथे दोन दिवसिय जिल्हा संमेलन
By मेहरून नाकाडे | Published: April 5, 2024 05:45 PM2024-04-05T17:45:08+5:302024-04-05T17:46:21+5:30
रत्नागिरी : मराठी संवर्धन, मराठीचा जागर करण्याकरिता कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा मराठी साहित्य संमेलन दि.६, ७ एप्रिल रोजी ...
रत्नागिरी : मराठी संवर्धन, मराठीचा जागर करण्याकरिता कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा मराठी साहित्य संमेलन दि.६, ७ एप्रिल रोजी मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अनुपमा उजगरे भूषविणार असून स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत आहेत.
संमेलनात शनिवारी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येईल. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश जोशी, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, अरुण नेरूरकर, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी यांचीही उपस्थिती लाभणार आहे. दोन दिवस भगरच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.