आरएसी टेक्निशियन असोसिएशनतर्फे दोन दिवसीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:12+5:302021-09-24T04:37:12+5:30
रत्नागिरी : विजेची बचत होण्यासाठी इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीची सर्वच उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ही उपकरणे हाताळताना आरएसी ...
रत्नागिरी : विजेची बचत होण्यासाठी इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीची सर्वच उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ही उपकरणे हाताळताना आरएसी टेक्निशियन यांना सुलभतेने काम करता यावे, याबाबत सखोल ज्ञान व्हावे, यासाठी आरएसी टेक्निशियन असोसिएशनतर्फे दिनांक २६ आणि २७ सप्टेंबर असे दोन दिवस रत्नागिरी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
आरएसी टेक्निशियन असोसिएशन, रत्नागिरी या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जुलैमधील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे कोकणात दाणादाण उडाली. यावेळीही आरएसी टेक्निशियन असोसिएशनने चिपळूण येथे जाऊन मदतीचा हात दिला होता.
रत्नागिरी तालुक्यात रेफ्रिजरेटर, एअरकंडिशनर, वाॅशिंग मशीन विक्रेते व मेंटेनन्स करणारे टेक्निशियन आहेत. बाजारात नवनवीन टेक्नॉलॉजीवर आधारित उपकरणे येत आहेत.
सद्यस्थितीत वीज बील कमी कसे येईल, त्याचप्रमाणे वातावरण दूषित होणार नाही, याची काळजी घेत शासनाकडून कंपन्यांना सूचना दिल्या जात आहेत. कंपन्याही आपल्या प्रॉडक्टमध्ये बदल करून नवनवीन टेक्नॉलॉजी बाजारात आणत आहेत.
कार्यशाळेत इन्व्हर्टर रेफ्रिजरेटर, एसी बेसिक सायकल, फाॅल्टफायंडिंग, रिपेअरिंग व रेफ्रिजरेशन अत्याधुनिक टेक्नॉलॉजी याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील आरएसी टेक्निशियन यांनी या कार्यशाळेत नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.