कोकण रेल्वे मार्गावर दाेन दिवस मेगाब्लॉक; पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर हेणार परिणाम

By शोभना कांबळे | Published: October 8, 2023 01:06 PM2023-10-08T13:06:57+5:302023-10-08T13:07:04+5:30

या मेगाब्लाॅकमुळे दाेन दिवसात पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम हाेणार आहे.

Two Days Megablock on Konkan Railway; The schedule of five trains will be affected | कोकण रेल्वे मार्गावर दाेन दिवस मेगाब्लॉक; पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर हेणार परिणाम

कोकण रेल्वे मार्गावर दाेन दिवस मेगाब्लॉक; पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर हेणार परिणाम

googlenewsNext

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर कडवई (ता. संगमेश्वर) ते रत्नागिरी दरम्यान मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी तर मडगाव ते कुमठा या दरम्यान १२ ऑक्टोबर २०२३ रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लाॅकमुळे दाेन दिवसात पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम हाेणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कडवई ते रत्नागिरी दरम्यान १० ऑक्टोबर रोजी सकाळी ७:४० ते १०:४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे १९५७७ तिरुनवेली ते जामनगर ही ९ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रवास सुरू होणारी गाडी ठोकर ते रत्नागिरी दरम्यान तीन तास रोखून ठेवली जाणार आहे. तसेच ९ ऑक्टाेबर राेजी प्रवास सुरू हाेणारी १६३४६ ही मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्स्प्रेस गाडी ठोकर ते रत्नागिरी दरम्यान १ तास ३० मिनिटे थांबवून ठेवली जाईल. तसेच १० ऑक्टोबर रोजी मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५१) खेड ते चिपळूण दरम्यान २० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी मडगाव ते कुमठा दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या तीन तासांच्या कालावधीत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या दरम्यान मंगळूर सेंट्रल ते मडगाव दरम्यान धावणारी ०६६०२ ही विशेष गाडी मंगळुरू ते कुमठा यादरम्यान चालवली जाईल. पुढे कुमठा ते मडगाव दरम्यान ती रद्द केली जाणार आहे. तसेच मडगाव ते मंगळूर दरम्यान धावणारी ०६६०१ ही विशेष गाडी कुमठा ते मंगळूर अशी चालवली जाईल. मडगाव ते कुमठा दरम्यान ही गाडी रद्द केली जाईल.

Web Title: Two Days Megablock on Konkan Railway; The schedule of five trains will be affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.