राज्य कॅरम संघटनेत रत्नागिरीच्या दोघांची वर्णी
By अरुण आडिवरेकर | Published: July 24, 2023 03:49 PM2023-07-24T15:49:30+5:302023-07-24T15:50:03+5:30
रत्नागिरी : सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी मुंबई महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पालघरच्या जितेंद्र ...
रत्नागिरी : सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी मुंबई महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पालघरच्या जितेंद्र शाह यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदीप भाटकर यांची उपाध्यक्षपदी तर अजित सावंत यांची खजिनदारपदी पुन्हा वर्णी लागली आहे.
पुण्याचे भारत देसडला यांनाही दुसऱ्यांदा कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. तर मानद सचिव या पदावर मुंबईच्या अरुण केदार यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या अजित सावंत यांचीही खजिनदारपदी दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन करंडे यांनी निवडणुकीचा निकाल वाचून दाखविला.
बिनविरोध निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - जितेंद्र शाह (पालघर), कार्याध्यक्ष - भारत देसडला (पुणे), उपाध्यक्ष - धनंजय साठे (सांगली), गिरीश तुळपुळे (रायगड), मंजूर अहमद खान (जळगाव), प्रदीप भाटकर (रत्नागिरी), यतिन ठाकूर (मुंबई), मानद सचिव - अरुण केदार (मुंबई), खजिनदार - अजित सावंत (रत्नागिरी), मानद सहसचिव - अभिजित मोहिते (काेल्हापूर), दत्तप्रसाद शेंबेकर (ठाणे), इक्बाल नबी (मुंबई उपनगर), केतन चिखले (मुंबई), योगेश फणसळकर (सिंधुदुर्ग), कार्यकारिणी सदस्य - आनंद खरे (नाशिक), आशुतोश धोडमिसे (पुणे), जितेंद्र दळवी (ठाणे), संतोष चव्हाण (मुंबई उपनगर).