दापोली शहरात दोन किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:12+5:302021-08-13T04:36:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : दापोली शहरातील केळसकर नाक्याजवळ दाभोळ मार्गावर तब्बल दोन किलो गांजा पकडण्यात आल्याने खळबळ उडाली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : दापोली शहरातील केळसकर नाक्याजवळ दाभोळ मार्गावर तब्बल दोन किलो गांजा पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, दापाेली पाेलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी ही कारवाई केली.
याप्रकरणी मकसूद जाफर पावसकर (रा. कोकंबा आळी, दापोली), साहिल अब्बास पठाण (रा. मच्छीमार्केट, दापोली) या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. दापोली पोलीस स्थानक व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दापोली शहरात गांजा विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही दापोली शहरात कोकंबा आळी येथे गांजाविरोधात मोठी कारवाई केली होती. त्यावेळी याच परिसरातून एका महिलेला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.