राजापूरजवळ बस अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 06:42 PM2017-09-02T18:42:52+5:302017-09-02T18:43:18+5:30

राजापूर/वाटूळ : गोव्याकडून मुंबईकडे जाणारी खासगी आरामबस झाडावर आदळून दोन प्रवासी ठार झाल्याचा प्रकार मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटुळ घाटात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. कुडाळमधील शिवराम यशवंत परब आणि मुंबईच्या रेश्मा रमाकांत पंडीत हे दोघेजण या अपघातात ठार झाले तर ३० प्रवासी जखमी झाले. हे प्रवासी गोवा, मुंबई व सिंधुदुर्गमधील आहेत.

Two killed in bus accident near Rajapur | राजापूरजवळ बस अपघातात दोन ठार

राजापूरजवळ बस अपघातात दोन ठार

Next


राजापूर/वाटूळ : गोव्याकडून मुंबईकडे जाणारी खासगी आरामबस झाडावर आदळून दोन प्रवासी ठार झाल्याचा प्रकार मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटुळ घाटात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. कुडाळमधील शिवराम यशवंत परब आणि मुंबईच्या रेश्मा रमाकांत पंडीत हे दोघेजण या अपघातात ठार झाले तर ३० प्रवासी जखमी झाले. हे प्रवासी गोवा, मुंबई व सिंधुदुर्गमधील आहेत.


गोव्यातील गिब्स या ट्रॅव्हलर कंपनीची खासगी आरामबस (जीए ०३ - एन ४७०४) शुक्रवारी सायंकाळी गोव्याहून मुंबईकडे निघाली. सुरूवातीला बसमध्ये कमी प्रवासी होते. त्यानंतर म्हापसा, झाराप, कणकवली, पणदुर, मालवण, कट्टा आदी ठिकाणचे प्रवासी बसमध्ये चढले होते. एकूण ३२ प्रवासी त्या बसमधून प्रवास करीत होते. रात्री दहाच्या दरम्यान वाटुळ घाटीतील एका अवघड वळणार बसचालक राजेश कांबळे याचा ताबा सुटला व बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऐनाच्या झाडावर आदळली व मार्गावरच कलंडली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या धडकेने ऐनाचे झाड मोडून पडले. प्रवाशांमध्ये खूप मोठा आरडाओरडा सुरू झाला.


बसला अपघात झाल्याची खबर ओणी - पाचल फाट्यावर उभारण्यात आलेल्या पोलीस पथकाला मिळताच काही मिनिटातच तेथील वर्दीवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. राजापूरच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की आपल्या सहकाºयांसह वाटुळ घाटात पोहोचल्या.
वाटुळ व परिसरातील अनेक स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले.

या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळेली - कुडाळमधील शिवराम यशवंत परब (४९) जागीच ठार झाले होते. त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. बसखाली अडकल्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. नंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले होते. त्यातील काहींची अवस्था नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लांजा तसेच रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

तेथे उपचार सुरु असताना रेश्मा रमाकांत पंडीत (५६, परळ पूर्व, मुंबई) यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती रमाकांत पर्शुराम पंडीत हेही त्याच बसमधून प्रवास करीत होते. तेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरीत उपचार सुरु आहेत.
अपघातातील जखमी प्रवाशांना ओणीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रासह राजापूर, लांजा व रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.


या अपघातानंतर उपविभागाचे पोलीस अधिकारी मारुती जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राजापूरच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामसिंग पाटील, हेडकॉन्स्टेबल जाधव, साळुंखे, पोलीस नाईक प्रकाश झोरे, योगेश तेंडुलकर, अतुल ठाकुर, युवराज सूर्यवंशी, नीलेश जाधव, योगेश भाताडे, महामार्गचे सहाय्यक उपनिरीक्षक हलगी, साळुंखे आरटीओचे अधिकारी आदी घटनास्थळी उपस्थित होते.


महामार्ग लवकर मोकळा


या अपघातानंतर महामार्ग पोलीसांसह खास गणपती सणासाठी महामार्गावर उभारलेल्या पथकांमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. महामार्गावर असलेली क्रेन मागवून अपघातग्रस्त बस हलवण्यात आली. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला.

राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल जखमी
बाबनाथ विठोबा गोसावी (४७), प्रिया रवींद्र गावडे (४६), अपर्णा शिवाजी परब (५५), दीपा बाबनाथ गोसावी, देवांग सतीश झारापकर (१६), राजेश बापू कांबळे (४७, बसचालक), प्रथमेश शिवाजी परब (२५), रवींद्र सावळाराम गावडे (४८), सौ. प्रिया रवींद्र गावडे (३५), अ. ना. उजगावकर (३४), सौ. रश्मी राजन देसाई (४८), अपर्णा बबन सावंत (३०), मंगेश वसंत चारी (२९), विजयालक्ष्मी बाबाजी सावंत देसाई (४८), रामचंद्र बापू चव्हाण (६५), राजेश बापुराव गोसावी (४८), योगेश हरिश्चंद्र सावंत (२५)

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आलेले जखमी
रमाकांत पर्शुराम पंडीत (६२), उदय बापू परब (३६), रुपेश रघुवीर पाष्टे (३४), सचिन रघुवीर पाष्टे (३२), शिरीष चंद्रकांत सावंत (३०), रुचिता चंद्रकांत सावंत (६२), त्रिमूर्ती राजाराम सावंत (५१), अक्षय त्रिमूर्ती सावंत (२४), साबाजी राघोबा देसाई (२४), ओमकार साबाजी देसाई (२४), रवींद्र मनोहर परब (४९), रविना रवींद्र परब (४५), स्नेहा रवींद्र परब (१४)

Web Title: Two killed in bus accident near Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.