लांजात रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून सांगलीच्या दाेघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:31 PM2024-08-14T13:31:12+5:302024-08-14T13:32:40+5:30

लांजा (जि. रत्नागिरी) : रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात लांजा ...

Two of Sangli died after the truck hit the wall of the railway bridge at Lanja Ratnagiri district | लांजात रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून सांगलीच्या दाेघांचा मृत्यू

लांजात रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून सांगलीच्या दाेघांचा मृत्यू

लांजा (जि. रत्नागिरी) : रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात लांजा तालुक्यातील कुरचुंब-तळवडे मार्गावर तळवडे येथे साेमवारी रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान झाला. भरधाव वेगाने जात असताना उतारात वाहनावर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चालक कमलाकर भागप्पा केंगार (२८, रा. आसंगी तुर्क-पांडोझरी, जत, सांगली) आणि क्लिनर कमलाकर शिवराम जेजगे (१७, रा. जाडरबाेबलाड, जत, सांगली) अशी मृत्यू झालेल्या दाेघांची नावे आहेत. कमलाकर केंगार हा चिरे भरून ट्रक (केए- २८, डी- ५३१२) घेऊन सापुचेतळे येथून चिरा भरून सोमवारी सायंकाळी निघाला होता. 

लांजा येथून आसगे मार्गे दाभोळे रस्त्याने जात असताना तळवडे येथील उतारात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक कुरचुंब-तळवडे येथे असलेल्या कोकण रेल्वे पुलाच्या भिंतीला धडकला. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की, ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात चालक कमलाकर केंगार व क्लिनर कमलाकर जेजगे यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Two of Sangli died after the truck hit the wall of the railway bridge at Lanja Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.