दापोलीत म्हाडाचा २६० घरांचा प्रकल्प उभारणार : उदय सामंत यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 04:59 PM2019-01-28T16:59:49+5:302019-01-28T17:01:45+5:30
दापोली शहरात असलेल्या कोकण म्हाडाच्या जागेवर लवकरच सामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पातून दापोलीकरांचे स्वस्तात घरे मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दापोली : दापोली शहरात असलेल्या कोकण म्हाडाच्या जागेवर लवकरच सामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पातून दापोलीकरांचे स्वस्तात घरे मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावेळी सामंत पुढे म्हणाले की, दापोली येथे या प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण २६० घरे उपलब्ध होणार आहेत. यामध्ये अल्प उत्पन्न गटासाठी ३३० चौरस फुटाची १६० घरे तर मोठ्या गटासाठी ४५० चौरस फुटाची १०० घरे याठिकाणी उपलब्ध होतील, अशी माहिती दिली. दापोली शहरात नगरपंचायत हद्दीत कोकण म्हाडाची एकूण ७.५ हेक्टर जागा असून, या जागेची पाहणी आमदार उदय सामंत यांनी केली.
लवकरच अंदाजपत्रक बनवून या विषयाला प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल व येत्या काही दिवसात दापोलीतील प्रकल्पाचे•भूमिपूजन करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. या घरांसाठी अडीच लाख रूपयांची सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पात दापोलीकरांसाठी एक सुसज्ज कम्युनिटी हॉल किंवा सांस्कृतिक सभागृह याबाबत नगरपंचायतीकडून जो प्रस्ताव येईल, त्यानुसार बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण म्हाडा प्रकल्पात रिक्षामालक जर घर खरेदी करणार असेल तर १ लाख रुपये व कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असेल तर २ लाख रूपयांची सवलत दरात देण्यात येईल, अशी माहितीही सामंत यांनी दिली. या प्रकल्पासाठी नियमानुसार लॉटरी काढण्यात येणार असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर किंवा बांधकाम करण्याच्या आधी त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
आपण कायम सेनेतेच
आपण कायम शिवसेनेमध्येच असून, याचठिकाणी भविष्यात निवृत्त होऊ. आपल्याबद्दल चालू असलेल्या चर्चा या धादांत खोट्या असून, केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रत्नागिरीत सभा घेतली होती, तरीही शिवसेचाच उमेदवार म्हणून मी निवडून आलो. रत्नागिरीत आपल्यासमोर कोणीही उभे राहावे, असे आव्हान त्यांनी दिले.