चक्रीवादळाने सारं काही हिरावलं, तरी कॉफीच्या शेतीनं सावरलं; दापोलीतील शेतकऱ्याची यशस्वी गाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:21 PM2022-02-23T17:21:50+5:302022-02-23T17:53:09+5:30

कोकणातील लाल मातीत किफायतशीर पीक

Uday Joshi a progressive farmer from Dapoli cultivates a copy crop | चक्रीवादळाने सारं काही हिरावलं, तरी कॉफीच्या शेतीनं सावरलं; दापोलीतील शेतकऱ्याची यशस्वी गाथा

चक्रीवादळाने सारं काही हिरावलं, तरी कॉफीच्या शेतीनं सावरलं; दापोलीतील शेतकऱ्याची यशस्वी गाथा

googlenewsNext

शिवाजी गोरे

दापोली : अवकाळी पाऊस, चक्रीवादळे या नैसर्गिक आपत्तीने कोकण किनारपट्टीवरील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले, पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र यातही दापोलीतील प्रगतशील शेतकऱ्याला कॉफी पिकाने सावरलं. उदय जोशी असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. चक्रीवादळाने सारं  काही हिरावलं, तरीही कॉफी पिकाने सावरलं, असे उदय जोशी यांनी सांगितले.

कोकणातील लाल मातीत सर्वसाधारण जमिनीत सुद्धा कॉफी शेती अतिशय किफायतशीर होऊ शकते. या पिकावर कोणतेही चक्रीवादळाचा परिणाम होत नसून हे पीक शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असल्याचे उदय जोशी यांनी सांगितले.

जोशी यांनी कॉफी लागवड सहा वर्षापूर्वी केली होती. केरळ राज्यातून दोन बिया आणून त्यांनी कॉफीची लागवड केली होती. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून आज त्यांच्याकडे १४० ते १६० कॉपीची झाडे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे निसर्ग वादळात आंबा, काजू, नारळ, सुपारी, व अनेक जंगली झाडांना फटका बसला. काही झाडे उन्मळून पडली तर काही झाडांचं उत्पन्न घटलं. मात्र, त्याही परिस्थिती कॉफी चे झाडे तग धरून होती. या झाडावर कोणताही परिणाम झाला नाही.

कॉफीला मोठी मागणी

कॉफीच्या ६ वर्षाच्या झाडापासून सुमारे साडेतीन किलो कॉफी मिळत आहे , ओली कॉफी १४० ते १५० किलो प्रमाणे विकली जात आहे . काही लोक कॉफी बनवण्यासाठी विकत घेतात तसेच काही शेतकरी तर लागवडीसाठी बियाणे म्हणून विकत घेतात. त्यामुळे चांगलाच फायदा होतो. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झाली असल्याने प्रोसेसिंग करिता गावातील शेतकरी कॉफीच्या बिया विकत घेत आहे.

कोकणातील लाल मातीत किफायतशीर पीक

कोकणातील लाल मातीत किफायतशीर पीक म्हणून शेतकऱ्याने या पिकाचा विचार करायला हरकत नाही. तसेच कोकणातील वातावरणात हे पीक अतिशय उत्तम प्रकारे येऊ शकतं. त्याचा शेतकऱ्यांना खास फायदा होऊ शकतो. बागायती शेतीला पर्याय म्हणून कॉफी चा पर्याय उपलब्ध आहे.

Web Title: Uday Joshi a progressive farmer from Dapoli cultivates a copy crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.