हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 06:31 PM2023-12-10T18:31:47+5:302023-12-10T18:33:32+5:30

Uday Samant On Maratha Reservation: मराठा आरक्षणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा घेण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार तो विषय घेतला जाणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

uday samant give important information about to discussion on maratha reservation issue in maharashtra winter session 2023 | हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती

हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती

Uday Samant On Maratha Reservation: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातच मराठा आरक्षणावरून नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. यातच हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा कधी येणार, याबाबत राजकीय वर्तुळात कयास बांधले जात होते. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात मी ज्यावेळी मनोज जरांगे यांना भेटलो होतो, त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात चर्चा होईल असे आश्वासन दिले होते. मनोज जरांगे यांनी जी पहिली मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण केली आहे. त्याच्यावर काम सुरू असून, निजामकालीन ज्या काही नोंदी सापडत आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा

हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात चर्चा होणार आहे. मराठा समाजाच्या, आरक्षणाच्या निमित्ताने ही चर्चा होणार आहे. या चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अनेक गोष्टी सांगतील. इम्पिरिकल डेटा गोळा करून, आयोगाला सांगून, जमा झालेला इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात मांडून मराठा समाज कसा मागासलेला आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारा आरक्षण आम्ही देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उदय सामंत यांनी उत्तर दिले. आदित्य ठाकरे यांना काय वाटते यापेक्षा मुंबईकरांना काय वाटते हे महत्वाचे आहे. मुंबईची स्वच्छता करण्यासाठी आजपर्यंत कधीही कोणता मुख्यमंत्री रस्त्यावर उतरला नसल्याची लोकांची प्रतिक्रिया आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्याने कॉंक्रिटीकरणाचा निर्णय घेतला नाही, कोणताही मुख्यमंत्री नाल्यात उतरून सफाई कशी झाली हे पाहत नाही. त्यामुळे ज्यांनी कधी नाल्यात उतरून सफाई केली नाही, कधी रस्त्यावर येऊन स्वच्छता केली नाही त्यांना याचे महत्व कळणार नाही. मुंबईकरांनी कालच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: uday samant give important information about to discussion on maratha reservation issue in maharashtra winter session 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.