उद्धवसेनेच्या भास्कर जाधव यांचा निसटता विजय, शिंदेसेनेच्या राजेश बेंडलांनी कुठं मिळवली आघाडी.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 07:13 PM2024-11-28T19:13:15+5:302024-11-28T19:14:00+5:30

गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी शिंदेसेनेचे राजेश बेंडल यांच्यावर २,८३० मतांचा निसटता विजय मिळवला. त्यामध्ये ...

Uddhav Sena's Bhaskar Jadhav won Guhagar assembly constituency by a narrow margin of 2830 votes over Shindesena's Rajesh Bendal | उद्धवसेनेच्या भास्कर जाधव यांचा निसटता विजय, शिंदेसेनेच्या राजेश बेंडलांनी कुठं मिळवली आघाडी.. वाचा

उद्धवसेनेच्या भास्कर जाधव यांचा निसटता विजय, शिंदेसेनेच्या राजेश बेंडलांनी कुठं मिळवली आघाडी.. वाचा

गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी शिंदेसेनेचे राजेश बेंडल यांच्यावर २,८३० मतांचा निसटता विजय मिळवला. त्यामध्ये भास्कर जाधव यांनी चिपळूण तालुक्यातील ९२ मतदान केंद्रांवर २ हजार ५७६ व खेड तालुक्यातील ९० मतदान केंद्रांवर ५,७७० मतांची आघाडी घेतली, तर राजेश बेंडल यांना गुहागर तालुक्यातील १४० मतदान केंद्रांवर ५ हजार ७५४ मतांची आघाडी घेण्यात यश आले.

भास्कर जाधव यांना पहिल्याच चार फेरीत मिळालेले ८,०००चे मताधिक्य निर्णायक ठरले. या फेऱ्या खेड तालुक्यातील होत्या. खेड तालुक्यातून जाधव यांना ५,७७० मतांची आघाडी मिळाली. खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील शिरशी मोहल्ला, मोमके, मुंबके, अलसुरे, आष्टी येथे ४००हून अधिक, भोस्तेमधील दोन केंद्रांवर ४६४, कोंडिवली शिव बुद्रुक खोतवाडी असगणी या मतदान केंद्रांवर तीनशेहून अधिक मताधिक्य घेतले.

खेड तालुक्यात राजेश बेंडल पूर्णपणे पीछाडीवर गेले. त्यांना केवळ खारीमधून १६२ व बहिरवली २०८ या दोन केंद्रांवर एवढेच मोठे मताधिक्य घेता आले.

चिपळूण तालुक्यात २,५७६ मतांनी भास्कर जाधव आघाडीवर होते. यामध्ये कामथे व कामथे खुर्द दोन केंद्रांवर ६८८, भोममधील दोन केंद्रांवर ४४६, लोणारी बंदर ३००, कापरे, कातरोळी, कोकरे या केंद्रांवर त्यांनी २००हून अधिक आघाडी घेतली. राजेश बेंडल यांना वहाळमधील दोन केंद्रांवर ४६०, मुर्तवडे व कातळवाडी या केंद्रांवर ३५५ मताधिक्य मिळाले. पोसरे, आंबीडगाव, खेरशेत या केंद्रांवर २००हून अधिक मताधिक्य मिळाले.

गुहागर तालुक्यातून राजेश बेंडल यांनी ५,७७० मतांची आघाडी घेतली. गुहागर खालचा पाट केंद्रावर ५०८, हेदवी ३६६, अंजनवेल कातळवाडी ३२८, तसेच भातगाव तिसंग व धक्का या दोन केंद्रांवर ३९२ मताधिक्य घेतले. कौंढर, काळसूर, पालशेत, शीर, मासू, नरवण या केंद्रांवर २००हून अधिक मताधिक्य मिळाले.

भास्कर जाधव यांना पडवेतील दोन केंद्रांवर ५०४, गुहागर वरचापाट ४१५, शृंगारतळी ४७६, पालशेत ३०१, तसेच वरवेली, सुरळ, रामानेवाडी, कौंढर काळसूर येथून २०० मताधिक्य मिळाले.

Web Title: Uddhav Sena's Bhaskar Jadhav won Guhagar assembly constituency by a narrow margin of 2830 votes over Shindesena's Rajesh Bendal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.