भूमिगत वीजवाहिन्यांची कामे अद्याप अपूर्ण : पूर्ततेसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:06+5:302021-06-09T04:40:06+5:30

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या नॅशनल सायक्लॉन रिस्क मेटिगेशन प्रोजेक्ट (एनसीआरपीएम) अंतर्गत किनारपट्टी लगतच्या गावातून ...

Underground power lines still unfinished: Extension for completion | भूमिगत वीजवाहिन्यांची कामे अद्याप अपूर्ण : पूर्ततेसाठी मुदतवाढ

भूमिगत वीजवाहिन्यांची कामे अद्याप अपूर्ण : पूर्ततेसाठी मुदतवाढ

Next

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या नॅशनल सायक्लॉन रिस्क मेटिगेशन प्रोजेक्ट (एनसीआरपीएम) अंतर्गत किनारपट्टी लगतच्या गावातून भूमिगत वीजवाहिन्यांची कामे सुरू आहेत. मार्चपर्यंत कामे संपविण्याचे उद्दिष्ट असताना, कामे वेळेवर पूर्ण न झाल्याने कामांच्या पूर्ततेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कोलमडते. त्यावर पर्याय म्हणून ‘महावितरण’ने रत्नागिरीत शिरगाव ते राजीवडा भूमिगत वीजवाहिन्यांचा निर्णय घेतला. मार्चमध्ये भूमिगत वाहिन्यांचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाळा सुरू झाला तरी हे काम अपूर्ण आहे.

किनारपट्टी भागातील नागरिक आणि कोकणात येणाऱ्या पर्यटकांना विनाखंडित वीज सेवा मिळावी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी शहरातील वीजवाहिन्या भूमिगत टाकण्याचा निर्णय महावितरणने घेतला. केंद्र सरकारच्या नॅशनल सायक्लॉन रिस्क मेटिगेशन प्रोजेक्ट (एनसीआरपीएम) या अंतर्गत किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येत आहे. या कामासाठी २०१८ साली ९४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मार्च २०२१ पर्र्यत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र, हे काम रखडले असल्याने कामाच्या पूर्ततेसाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे.

शहरातील किनारपट्टी भागात वादळ, वारा, पाऊस यामुळे अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होतो. या योजनेतून किल्ला, पेठकिल्ला, शिरगाव, मिऱ्या, पांढरा समुद्र्र, मांडवी, राजीवडा आदी किनारपट्टी भागात यामुळे अखंडित वीजपुरवठा होणार आहे. सध्या शहरात पाणी आणि गॅसवाहिनीचे काम सुरू असून भूमिगत वीजवाहिनीचे काम मागे पडले आहे.

---------------------------

भूमिगत वीजवाहिनी टाकण्याच्या कामाची मुदत मार्च २०२१ पर्यंत होती. जर का हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळात ‘महावितरण’चे शहरातील नुकसान कमी प्रमाणात झाले असते. या योजनेतील काही गावांत वादळाने खंडित झालेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लोटला. त्यामुळे ग्रामस्थांना अंधारात राहावे लागले.

Web Title: Underground power lines still unfinished: Extension for completion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.