रत्नागिरी विभागातील एसटी सेवा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:52+5:302021-08-18T04:37:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेसाठी रत्नागिरी विभागातील एसटी सेवा सुरू होती. अनलाॅकनंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेसाठी रत्नागिरी विभागातील एसटी सेवा सुरू होती. अनलाॅकनंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, आतापर्यंत डिझेलची कमतरता न भासल्याने प्रवासी वाहतुकीला कोणतीच अडचण आली नाही.
लाॅकडाऊनपूर्वी ४,५०० फेऱ्या सुरू होत्या. अनलाॅकनंतर सोमवारपर्यंत १,७०० फेऱ्या टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र मंगळवारपासून फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली असून, ३ हजार फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे.
डिझेल तुटवडा भासला नाही
अनलाॅकनंतर मुख्य मार्गावरील बसेस सुरू करताना योग्य वेळापत्रक आखण्यात आले असल्याने डिझेल तुटवडा भासला नाही. कमी भारमानात मोजक्याच फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता फेऱ्यांची संख्या वाढली आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेत जिल्ह्यात रात्रवस्ती, शटल फेऱ्या, मुंबई-पुणे या लांब पल्याच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गणेशोत्सवापर्यंत उर्वरित सर्व फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. लाॅकडाऊनपासून एसटी सेवा सुरू असली तरी आतापर्यंत डिझेलचा तुटवडा न भासल्यामुळे वाहतुकीची समस्या भासली नाही.
- अनिल मेहतर, विभागीय वाहतूक अधिकारी रत्नागिरी.
सुरू झालेल्या फेऱ्या
३०००
रात्रवस्ती
१९०
शटल फेऱ्या
५०
लांब पल्ल्याच्या
११०