रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकच, निवडणुकीत संस्था पॅनलचा उडवला धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 07:16 PM2022-05-16T19:16:26+5:302022-05-16T19:16:43+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनलने विरोधी संस्था पॅनलचा एकतर्फी धुव्वा उडवला. अध्यक्षपदी केंद्रीय ...
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनलने विरोधी संस्था पॅनलचा एकतर्फी धुव्वा उडवला. अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी ४५५ मते मिळवून आणि कार्यवाह म्हणून सतीश शेवडे यांनी ३८२ मते मिळवून विजय संपादन केला. या दोन्ही पदांसह नियामक मंडळ सदस्य, विश्वस्त आणि सल्लागार असे सर्वच्या सर्व ३७ उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले.
सोमवारी सकाळी संस्थेच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २. ३० वाजता मोजणी संपली. कार्यवाह पदासाठी सतीश शेवडे व माजी कार्यवाह प्रा. माधव पालकर (२८३) यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत शेवडे यांनी त्यांचा ९९ मतांनी पराभव केला. सहकार्यवाह पदासाठी प्रा. श्रीकांत दुदगीकर (४८८) आणि नरेंद्र तथा नाना पाटील (१७७) यांच्यातील लढतीत प्रा. दुदगीकर यांनी एकतर्फी विजय मिळवला.
संस्था पॅनेलच्या रमेश कीर, भाऊ वैद्य यांच्यासमवेत सर्व उमेदवारांना पराभव स्वीकाराला लागला. नियामक मंडळाच्या सभेमध्ये कार्याध्यक्षपदाची निवड पुढील दोन दिवसांत करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. मकरंद साखळकर यांनी काम पाहिले. या कामासाठी ६० कर्मचारी, प्राध्यापक नियुक्त करण्यात आले होते.
उर्वरित निकाल असा (कंसामध्ये मिळालेली मते) :
उपाध्यक्ष- ॲड. विलास पाटणे (५००), डॉ. मुकुंद जोशी (४८८), ॲड. प्रदीप नेने (४६४).
विश्वस्त- रवींद्र तथा मुन्ना सुर्वे (४५०), लिलाधर जोशी (४३८), विवेक भावे (३५०).
सल्लागार मंडळ- डॉ. श्रीराम केळकर (५३७), सीए वरदराज पंडित (५१५), डॉ. सुजय लेले (५१३), निनाद जोशी (५०७), दत्तात्रय तथा नाना शिंदे (५०१), भारत फडके (५०१), अनघा चितळे (४९१), उमेश आपटे (४७९), संतोष गुरव (४६०) आणि स्वप्नील सावंत (४५३).
नियामक मंडळ- ॲड. प्राची जोशी (४९८), डॉ. चंद्रशेखर केळकर (४७२), सीए मंदार गाडगीळ (४६५), राजेंद्र मलुष्टे (४६४), मनोज पाटणकर (४४८), डॉ. संजय केतकर (४४६), डॉ. कल्पना मेहता (४४३), हेमंत उर्फ विजय देसाई (४३८), सचिन वहाळकर (४३५), ॲड. विजय साखळकर (४२०), ॲड. अशोक कदम (४१८), सुहास पटवर्धन (४१६), शिल्पा पटवर्धन (४१४), आनंद देसाई (३९९), सीए उमेश लोवलेकर (३९१), ॲड. अविनाश तथा भाऊ शेट्ये (३९१), भरत ओसवाल (३८५) आणि महेश नवेले (३५९).