वेलदूर शाळेत साजरा झाला अनोखा ‘फादर्स डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:56+5:302021-06-22T04:21:56+5:30
असगोली : गुहागर तालुक्यातील वेलदूर नं. १च्या जिल्हा परिषद शाळेत अनोख्या पद्धतीने फादर्स डे साजरा करण्यात आला. या दिवशी ...
असगोली : गुहागर तालुक्यातील वेलदूर नं. १च्या जिल्हा परिषद शाळेत अनोख्या पद्धतीने फादर्स डे साजरा करण्यात आला. या दिवशी ‘शाळा बंद; पण शिक्षण चालू’ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन फादर्स डे साजरा करण्यात आला.
यामध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनासाठी वडिलांचे सहकार्य घेण्यात आले. यामध्ये दैनंदिन शालेय अभ्यास, व्यावसायिक शिक्षण, चित्रकला मातीकाम, रंगकाम यासारखे विषय घेऊन विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला पालकांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात आले.
या अनोख्या उपक्रमाची संकल्पना वेलदूर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सुरेखा उडान यांनी मांडली. या उपक्रमाला केंद्रप्रमुख अशोक गावणकर, मुख्याध्यापक गणेश विचारे, सहकारी शिक्षक मंदार कानडे, स्नेहल वेल्लाळ, शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांचे सहकार्य लाभले.
------------------------
गुहागर तालुक्यातील वेलदूर शाळेत पालकासमवेत विद्यार्थिनीने वृक्षाराेपण केले. (छाया : मंदार गोयथळे)