मुंग्यांनी बनविले अनोखे घरटे
By admin | Published: September 1, 2014 10:00 PM2014-09-01T22:00:30+5:302014-09-01T23:55:44+5:30
हे पोळे ग्रामस्थांचे आकर्षण
कोयनानगर : पावसाळा सुरू झाल्यापासून निसर्गात अनेक कलाविष्कार पाहावयास मिळत आहेत. कामरगाव, ता़ पाटण येथेही एका झाडावर जमिनी पासून काही उंचीवर लाल मुंग्यांनी आगळेवेगळे पोळे बनवले आहे़ ते पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे़
कामरगाव येथे कोयना जलाशयाशेजारी एका झाडावर लाल मुंग्यांनी आगळेवेगळे पोळे बनवले आहे़ या पोळ्याचा आकार फुटबॉल एवढा असून, ते आतून मातीचे आणि वरून कापसाने बनविलेले आहे़ पोळ्याच्या खालच्या बाजूस छिद्रे असून, त्यातून मुंग्या आत बाहेर करत आहेत़ पावसापासून आपले घर वाचवण्यासाठी लहानशा मुंग्यांनी हे अनोखे पोळे बनवले आहे़ मुंग्यांनी हे पोळे बनविण्यास फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस प्रारंभ केल्याचे परिसरात नेहमी वावरणाऱ्या कोयनेतील संकेत मोहिते, शुभम कदम, प्रतीक पागे, वैभव कुलकर्णी, आकाश चव्हाण, किरण दिंडलकुप्पी या युवकांनी सांगितले. हे पोळे ग्रामस्थांचे आकर्षण बनले आहे. (वार्ताहर)