नवशी फाट्याजवळील अपघातात विद्यापीठातील कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:29 PM2020-09-28T12:29:52+5:302020-09-28T12:35:19+5:30
चढामध्ये कंटेनर अचानक मागे आल्याने कंटेनरच्या मागे असणाऱ्या दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना दापोली तालुक्यातील नवशी फाटाजवळ सोमवारी सकाळी घडली. या अपघातात दगावलेली व्यक्ती विद्यापीठातील कर्मचारी आहे.
दापोली : चढामध्ये कंटेनर अचानक मागे आल्याने कंटेनरच्या मागे असणाऱ्या दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना दापोली तालुक्यातील नवशी फाटाजवळ सोमवारी सकाळी घडली. या अपघातात दगावलेली व्यक्ती विद्यापीठातील कर्मचारी आहे.
दापोली तालुक्यातील टेटवली येथील कदमवाडीतील सुरेश कात्रे (४५) हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील हॉर्टीकल्चर विभागात कामाला होते. ते सकाळी आपल्या कर्तव्यावर निघाले होते.
कुंभवे नदी या पुलावरून जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या पुढे पूर्ण क्षमतेने भरलेला एक कंटेनर खेडकडून दापोलीकडे जात होता. हा कंटेनर चढामध्ये बंद पडून उलट्या दिशेने मागे आला. या कंटेनरच्या मागून सुरेश कात्रे हे आपली दुचाकी घेऊन दापोलीकडे येत होते.
अचानकपणे मागे येणाऱ्या कंटेनरने त्यांना चिरडले. या अपघातात सुरेश कात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. सुरेश कात्रे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.