खेड ते पनवेल मार्गावर उद्या धावणार अनारक्षित मेमू रेल्वे, चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार

By मनोज मुळ्ये | Published: September 23, 2023 05:44 PM2023-09-23T17:44:02+5:302023-09-23T17:44:18+5:30

खेड : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात विघ्न दूर करण्यासाठी यावर्षी प्रथमच रविवारी (२४ सप्टेंबर) खेड ते पनवेल ...

Unreserved MEMU train will run on Khed to Panvel route tomorrow | खेड ते पनवेल मार्गावर उद्या धावणार अनारक्षित मेमू रेल्वे, चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार

खेड ते पनवेल मार्गावर उद्या धावणार अनारक्षित मेमू रेल्वे, चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार

googlenewsNext

खेड : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात विघ्न दूर करण्यासाठी यावर्षी प्रथमच रविवारी (२४ सप्टेंबर) खेड ते पनवेल अशी पूर्णपणे अनारक्षित मेमू विशेष रेल्वे धावणार आहे. यामुळे खेडपासून पुढे पनवेलपर्यंतच्या प्रवासासाठी चाकरमान्यांना हक्काची गाडी मिळाली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी जादा गणपती स्पेशल गाड्यांच्या शेकडो फेऱ्या सध्या सुरू आहेत. मडगाव तसेच सावंतवाडी व व कुडाळ येथून सुटणाऱ्या गाड्या खेडला येईपर्यंत भरून येतात. त्यामुळे आरक्षण असूनही खेडपासूनच्या पुढील प्रवाशांना गाडीत चढणेही मुश्किल होते. यामुळे अनेकदा रेल्वे अडकवून ठेवण्याचे प्रकार घडतात.

यावेळी गैरसोय टाळण्यासाठी खेड ते पनवेल (०७१०२) ही मेमू विशेष रेल्वे रविवारी खेड स्थानकावरून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सुटणार आहे. ती पनवेलला संध्याकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे. खेडसह दापोली, मंडणगड तसेच रायगड जिल्ह्यातील कोकणवासीयांना या गाडीचा फायदा होणार आहे.

खेड-पनवेल मेमू स्पेशलचे थांबे

कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव, माणगाव, इंदापूर, कोलाड तसेच रोहा.

Web Title: Unreserved MEMU train will run on Khed to Panvel route tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.