रत्नागिरीत विजांसह अवकाळी पाऊस, बागायतदार धास्तावले
By मनोज मुळ्ये | Published: January 9, 2024 10:10 AM2024-01-09T10:10:20+5:302024-01-09T10:11:10+5:30
आंबा बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.
मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात सोमवारी मध्यरात्रीनंतर विजांसह अवकाळी पाऊस पडला. कीड रोगांमुळे आंबा कलमांवर सातत्याने फवारणी करावी लागत आहृ. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.
अलीकडेच बागांची साफसफाई करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांमध्ये फवारणीचे टप्पे सुरू केले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे केलेले फवारणीचे काय होणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
रत्नागिरी शहरात रात्री एक वाजल्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस जवळपास अर्धा एक तास सुरू होता. सकाळच्या सत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. वातावरण मृग नक्षत्र लागल्यासारखे पावसाळी आहे. त्याआधी सोमवारी लांजातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.