रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भवन उभारणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:59+5:302021-07-21T04:21:59+5:30

रत्नागिरी : राज्यात उर्दू भाषेची वाड्:मयीन प्रगती आणि समृद्धीसाठी नांदेड व मालेगावच्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये उर्दू घरे (भवन) उभारण्यासाठी ...

Urdu Bhavan to be set up in Ratnagiri district: Uday Samant | रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भवन उभारणार : उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भवन उभारणार : उदय सामंत

Next

रत्नागिरी : राज्यात उर्दू भाषेची वाड्:मयीन प्रगती आणि समृद्धीसाठी नांदेड व मालेगावच्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये उर्दू घरे (भवन) उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. उर्दू घरे (भवन) बांधण्याविषयी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत सामंत यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्यासह इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू घरे बांधण्याच्या प्रकल्पाला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भाषिक जनसमुदाय मोठ्या प्रमाणात आहे. उर्दू भाषेची वाड्:मयीन प्रगती आणि समृद्धी व्हावी, ही जनभावना लक्षात घेऊन जिल्ह्यात उर्दू घरे (भवन) उभारुन या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे कार्य केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी जागाही उपलब्ध असून, सर्व निकष पूर्ण होत आहेत. या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असून, उर्दू घरे उभारण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून अल्पसंख्याक विभागाकडे सादर करावा, असेही सामंत यांनी सांगितले.

उर्दू घरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक उर्दू घराकरिता स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार या समितीची लवकर स्थापना करून त्यामध्ये उर्दू अभ्यासकांचा समावेश करावा, असे निर्देशही सामंत यांनी यावेळी दिले.

Web Title: Urdu Bhavan to be set up in Ratnagiri district: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.