रत्नागिरीतील २ लाख रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा, १०८ रूग्णवाहिका ठरतेय लाईफलाईन  

By शोभना कांबळे | Published: July 3, 2024 05:32 PM2024-07-03T17:32:39+5:302024-07-03T17:33:20+5:30

रत्नागिरी : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ जानेवारी २०१४ रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सेवा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रमासह महाराष्ट्र आपत्कालीन ...

Urgent health care for 2 lakh patients in Ratnagiri, 108 Ambulance is becoming a lifeline | रत्नागिरीतील २ लाख रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा, १०८ रूग्णवाहिका ठरतेय लाईफलाईन  

रत्नागिरीतील २ लाख रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा, १०८ रूग्णवाहिका ठरतेय लाईफलाईन  

रत्नागिरी : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ जानेवारी २०१४ रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सेवा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रमासह महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) सुरू केली. या आपत्कालीन वैद्यकीय सेवेने जून २०२४ या १० वर्षांच्या कालावधीत १,००,००,७८७ आपत्कालीन रुग्णांना दिवसरात्र आरोग्य सेवा दिली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील २,११,४२५ रूग्णांसाठी लाईफलाईन ठरली आहे. या सेवेने राज्यातील १ कोटीहून अधिक रुग्णांच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा पूर्ण केल्या आहेत, १०८ ही वैद्यकीय सेवा वेळेवर आणि जीव वाचवणारी जीवनदायिनी ठरली आहे.

 महाराष्ट्रामध्ये २३३ ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट (ALS) आणि ७०४ बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका (BLS) अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रगत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या आणि उच्च प्रशिक्षित कर्मचारी असलेल्या ९३७ रुग्णवाहिकांच्या ताफ्यासह काम करत आहेत. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादात नवीन बेंचमार्क सेट करण्याचे आश्वासन दिले जाते. विशेषत: गंभीर परिस्थितीत रुग्णांपर्यंत जलद पोहोचण्यासाठी शहरी भाग, दुर्गम आणि आदिवासी भाग आणि महामार्ग यांचा समावेश करून ही सेवा २४ तास कार्यरत असते.

एमईएमएस १०८ रुग्णवाहिका सेवा आपत्कालीन आरोग्य सेवांमधील अंतर भरून काढण्यासाठी आणि गरजूंना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी कार्यरत आहे. ही रुग्णवाहिका विविध वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज असते. अपघातांपासून ते हृदयविकाराच्या घटनांमधील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना शक्य तितकी सर्वोत्तम काळजी घेतली जाते.

कोरोना काळात देखील या १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेमार्फत अनेक रुग्णाचे प्राण वाचविण्याचे उत्तम कार्य केले आहे. दहा वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्हातील २,११,४२५ रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हातील रुग्णवाहिकांवर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिका चालक यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या या अविरत सेवेबद्दल जिल्ह्यातील जनतेकडून व लोकप्रतिनिधींकडून कौतुक होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रकारच्या रूग्णांना १० वर्षात मिळालेली सेवा

  • वाहन अपघात : ७०४५
  • हल्ला : ४६१
  • जळित : ७१७
  • हृदयविकार : १४व२
  • पडण्यामुळे अपघात : २७१०
  • विषबाधा : ४२९८
  • अवघड प्रसुती : १८,४४३
  • विजेचा शाॅक : ५९
  • सामुहिक अपघात : ८९८
  • वैद्यकीय मदत : १,४४,२७८
  • इतर : २७३२२
  • पाॅली ट्रामा : ३६६४
  • आत्महत्या- आत्मघाताचा प्रयत्न : १२८
  • एकूण : २,११,४२५

Web Title: Urgent health care for 2 lakh patients in Ratnagiri, 108 Ambulance is becoming a lifeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.