प्रभागनिहाय लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:27+5:302021-06-05T04:23:27+5:30
लांजा : भाजपच्या मागणीनंतर लांजा नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी प्रभागनिहाय लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी ...
लांजा : भाजपच्या मागणीनंतर लांजा नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी प्रभागनिहाय लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष व आरोग्य सभापती स्वरुप गुरव यांनी तहसीलदारांची भेट घेऊन केली आहे.
लांजा शहरातील वाढती लोकसंख्या तसेच दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांना लसीकरण केंद्रापर्यंत जाणे शक्य नसल्याने त्यांना कोरोना लसीकरणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष व आरोग्य सभापती स्वरूप गुरव, शिवसेना शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, वैभव जोईल, आदींनी तहसीलदार समाधान गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रभागनिहाय कोरोना लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार समाधान गायकवाड यांनी या मागणीला हिरवा कंदील दिला आहे.