खेड तालुक्यात १० केंद्रांवर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:22+5:302021-04-08T04:31:22+5:30

खेड : तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, खेड नगर परिषद दवाखाना व कळंबणी उपजिल्हा रुग्णालय अशा एकूण दहा ठिकाणी ...

Vaccination at 10 centers in Khed taluka | खेड तालुक्यात १० केंद्रांवर लसीकरण

खेड तालुक्यात १० केंद्रांवर लसीकरण

googlenewsNext

खेड : तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, खेड नगर परिषद दवाखाना व कळंबणी उपजिल्हा रुग्णालय अशा एकूण दहा ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू झाली आहेत. यामध्ये जनतेसाठी करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर यासारख्या रोगांनी त्रस्त असणाऱ्या ४५ ते ५९ या वयोगटातील आणि ६० पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.

तालुक्यात ४५ ते ५९ या वयोगटात सुमारे ७,७०० लाभार्थी असून ६० पेक्षा अधिक वयाचे ३१,४२३ असे एकूण ३९,१२३ लाभार्थी आहेत. यामध्ये तळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४,५०७, फुरुस केंद्रात ५,८४३, कोरेगाव ३,२०४, आंबवली ४,४३६, लोटे ५,०२७, वावे ३३४०, शिव बु. ४,००६, तिसंगी २,३०० व खेड नगर परिषदेअंतर्गत ६,४६० लाभार्थींचा समावेश आहे. ८ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान तालुक्यातील दहा केंद्रांमध्ये ८३५४ एवढ्या लाभार्थींना लसीकरण पूर्ण झाले आहे.

तालुक्यातील सर्वच केंद्रांमध्ये कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

लस सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आइस लाइण्ड रेफ्रिजरेटर सर्व लसीकरण केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे एका लसीकरण केंद्रात पाच कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक व इतर तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असतो.

कोरोना महामारीला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. कामाच्या प्रचंड ताणामुळे या विभागातील काही कर्मचाऱ्यांनी गेले वर्ष भर रजा घेतलेली नाही. आपत्कालीन परिस्थितीत या विभागाचे अधिकारी व कर्मचारी चोवीस तास

कार्यरत आहेत. सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात अडचणी निर्माण होत आहे. तालुक्यातील आवाशी, जामगे व काडवली या तीन आरोग्य उपकेंद्रांत नवीन लसीकरण केंद्रे प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत ८३५४ सर्वसामान्य नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. यामध्ये तळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६५४, फुरुस केंद्रात ५८८, कोरेगाव ५५७, लोटे ८०३, वावे ७२०, शिव बु. ८७७, तिसंगी २,३४१, आंबवली २८९, खेड नगर परिषदेअंतर्गत १,१७३ तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे ७३ लाभार्थींचा समावेश आहे.

Web Title: Vaccination at 10 centers in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.