शहरातील २५० व्यापाऱ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:30 AM2021-04-17T04:30:47+5:302021-04-17T04:30:47+5:30
रत्नागिरी : येथील व्यापारी महासंघाच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य विभागातर्फे व्यापाऱ्यांसाठीचे विशेष कोविड लसीकरण शिबिर गुरुवारी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात ...
रत्नागिरी : येथील व्यापारी महासंघाच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य विभागातर्फे व्यापाऱ्यांसाठीचे विशेष कोविड लसीकरण शिबिर गुरुवारी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित केले होते. या लसीकरणाचा लाभ २५० व्यापाऱ्यांनी घेतला.
रत्नागिरी व्यापारी महासंघाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे अशा शिबिराची मागणी केली होती. व्यापारी हा सुपरस्प्रेडर या वर्गात मोडत असल्याने प्राधान्याने त्यांचे लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित केले होते. व्यापारी महासंघाने या शिबिरादरम्यान लाभार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी बैठक व आराम व्यवस्था केेली होती. हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी यांच्याकडून लाभार्थ्यांना चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.