राजापुरात २८ हजार लोकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:37+5:302021-06-16T04:42:37+5:30
राजापूर : लसीकरणाबाबत आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला तालुक्यामध्ये चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयामध्ये झालेल्या ...
राजापूर : लसीकरणाबाबत आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला तालुक्यामध्ये चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयामध्ये झालेल्या लसीकरणामध्ये २८ हजार ८९२ लोकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेतल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनातर्फे मोफत कोविड लस देण्याला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये काही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी, तर काही आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी लोकांना कोविड लस दिली जात आहे. सद्य:स्थितीमध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन्ही कोविड लसींचे ४५ वर्षांवरील आणि खालील अशा दोन्ही वयोगटातील लोकांना दिले जात आहेत. आजपर्यंत २८ हजार ८९२ लोकांनी स्वयंस्फूर्तीने लस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामध्ये २३ हजार ९८७ लोकांनी पहिला तर पाच हजार लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.