कौढे - शिरळ येथे लसीकरण केंद्र सुरू करावे : जाफर गोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:31+5:302021-05-01T04:29:31+5:30
अडरे : कोरोना विषाणू प्रादुर्भाव झपाट्याने वाढत अतताना, हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने अत्यंत नियोजनबध्दरित्या लसीकरण मोहीम सुरू केली ...
अडरे : कोरोना विषाणू प्रादुर्भाव झपाट्याने वाढत अतताना, हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने अत्यंत नियोजनबध्दरित्या लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र गावे व वाड्यांपासून दूर असल्यामुळे काही ठिकाणी अडचणी येत आहेत. याचा विचार करून ग्रामस्थांच्या, ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार तेथे लसीकरण केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी येथील जाफर गोठे यांनी केली आहे.
चिपळूण तालुक्यातील शिरळ - कोंढे ही मोठी लोकसंख्या असलेली दोन प्रमुख गावे खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येतात. भौगोलिकदृष्ट्या हे केंद्र फार दूर असल्याने ज्येष्ठ नागरिकांना तेथे पोहोचणे शक्य नाही शिवाय लसीकरण ठिकाणी जाणे खर्चिक आहेच व तासन्-तास थांबावे लागते. या सर्वांचा विचार करून शिरळ - कोंढे या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे. ग्रामीण भागात लसीकरणाबाबत ग्रामस्थांमध्ये भीती आहे. अफवा पसरविल्या जातात. अशावेळी लसीकरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायतीनेही जनजागृती मोहीम राबविली पाहिजे, अशी सूचनाही गोठे यांनी केली आहे.