रायपाटण ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:30 AM2021-04-08T04:30:55+5:302021-04-08T04:30:55+5:30
राजापूर : तालुक्याच्या पूर्व परिसरातील रायपाटण ग्रामीण रुग्णालयात कोविडच्या लसीकरणाला शुभारंभ झाला आहे. ...
राजापूर : तालुक्याच्या पूर्व परिसरातील रायपाटण ग्रामीण रुग्णालयात कोविडच्या लसीकरणाला शुभारंभ झाला आहे. रायपाटणचे सरपंच महेंद्र भिकू गांगण यांच्या हस्ते या लसीकरणाचा शुभारंभ झाला.
तालुक्याच्या पूर्व परिसरातील सुमारे ३० ते ४० गावांसाठी असलेल्या रायपाटण ग्रामीण रुग्णालयात सोमवारपासून कोविडच्या लसीकरणाला सुरुवात झाली, स्थानिक ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार व गावचे सुपुत्र संतोष कोलते यांनी कॉम्प्युटर उपलब्ध करुन दिल्याने या लसीकरणातील अडथळे दूर झाले. सोमवारी सकाळी रुग्णालयात सरपंच महेंद्र भिकू गांगण यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले. त्यावेळी गावच्या उपसरपंच संजीवनी कारेकर, ग्रामपंचायत सदस्य नीलेश चांदे, अनंत शेटे, माजी सरपंच राजेश नलावडे, संतोष कोलते, विनायक निखार्गे, गजानन जोशी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरपंच गांगण, उपसरपंच कारेकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व अन्य ग्रामस्थांना यावेळी लस देण्यात आली.